देशात करोडोंच्या संख्येने रिलायन्स जिओचे ग्राहक आहेत. गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर जिओच्या ग्राहकांनी पाठ देखील फिरविली आहे. याला महागलेली रिचार्ज कारण होती, असे असले तरी पुन्हा एकदा जिओने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. रिलायन्स जिओने काही प्लॅन्सचे दर तब्बल २० टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत.
रिलायन्स जिओने सध्या मोठ्या प्रमाणावर प्लॅन्सचे दर वाढविलेले आहेत. काही वर्षांपूर्वी जी रिचार्ज १४९ रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला मिळत होती ती आता २३९ रुपयांवर जाऊन पोहोचली आहेत. तसेच जिओने आता मुदतीचे दिवसही कमी जास्त केले आहेत. जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
आता जिओने आणखी काही प्लॅन्सच्या दरांत वाढ केली आहे. काही महिन्यांपूर्वी जिओने फिचर फोन लाँच केला होता. यावर जिओ काही खास प्लॅन ऑफर करत होती. ते फक्त या जिओ फोन युजर्सनाच उपलब्ध होते. या फोनसाठीचे तिन्ही प्लॅनमध्ये जिओने वाढ केली आहे. जिओने हे प्लॅन २० टक्के सूट देऊन उपलब्ध केले होते. आता या प्लॅनवरील इन्ट्रोडक्टरी ऑफर संपली आहे. यामुळे या प्लॅन्सच्या किंमती वाढल्या आहेत.
जिओ फोनवरील सर्वात स्वस्त प्लॅन १५५ रुपये होता, त्याची किंमत वाढून १८६ रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडीटी मिळत आहे. तसेच दिवसाला १ जीबी डेटा मिळत आहे. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जात होते.
१८५ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता २२२ रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये दर दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मोफत आहेत. व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे.
जिओफोनवर सर्वाधिक किंमतीचा रिचार्ज प्लॅन असलेला आणि १२ महिन्यांची व्हॅलिडीटी असलेला प्लॅन आता ८९९ रुपयांना झाला आहे. या प्लॅनची किंमत ७४९ रुपये होती. या काळात तुम्ही २४ जीबी डेटा वापरू शकणार आहात.
म्हणजेच २८ दिवसांसाठी दोन जीबी डेटा दिला जातो. महिना संपला की पुन्हा रिन्यू होतो.दर २८ दिवसांना ५० एसएमएस आणि फ्री व्हॉईस कॉलिंग मिळते.