Join us

JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:20 PM

JOB Alert National Hydraulic Power Corporation : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (National Hydraulic Power Corporation) अप्रेंटीस (Apprentice Jobs) पदांसाठी भरती आहे. नोटिफिकेशननुसार, ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण 11 रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनची अधिकृत वेबसाईट nhpc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

जागा

एकूण जागा -  11

इलेक्ट्रीशियन (Electrician) - 5

प्लम्बर (plumber) - 1

संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator) - 3

स्टेनोग्राफर (Stenographer) आणि सचिवालय सहाय्यक - 3

शैक्षणिक पात्रता

इच्छुक उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी ITI पास असणं गरजेच आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC / ST साठी पाच वर्षे, OBC साठी तीन वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी 10 वर्षांची सवलत असेल.

निवड प्रक्रिया

आयटीआय व दहावीच्या गुणांमधील गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

apprenticeshipindia.org या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी nbpshr@nhpc.nic.in यावर मेल करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :नोकरीभारत