Join us  

नोकरी बदलली आता आयटी रिटर्न कसा भरू?; जाणून घ्या सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 9:30 AM

कधी कधी फॉर्म १६ मध्ये माहिती भरण्यात काही चूक झालेली असू शकते. अशा स्थितीत नियोक्त्याकडून नव्या फॉर्म-१६ ची मागणी करावी. 

नवी दिल्ली - आयटीआरसाठी ३१ जुलै २०२४ ची अंतिम मुदत आहे. आयकर विवरणपत्र भरताना कंपनी किंवा नियोक्त्याने जारी केलेला फॉर्म १६ महत्त्वाचा असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ जूनपर्यंत हा अर्ज द्यावा लागतो. मूल्यांकन वर्ष पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्याने नवी नोकरी पत्करली असेल तर त्याला आधीच्या तसेच नव्या कंपनीने दिलेल्या फॉर्म १६ चा आधार घ्यावा लागतो. हा फॉर्म देणे बंधनकारक असते. 

करदात्यांनी कोणती काळजी घ्यावी? 

  • कर्मचाऱ्याने फॉर्मवरील त्याचा पॅन क्रमांक, नियोक्त्याचा पॅन, टॅन क्रमांक तपासावा. 
  • फॉर्म १६ आणि फॉर्म २६ एएस मध्ये नमूद केलेले टीडीएसचे आकडे एकच आहेत याची खात्री करावी. 
  • पॅन क्रमांक चुकीचा असेल तसेच वेतनातून कापून घेतलेल्या कराचा तपशिल नसेल तर रिफंडसाठी केलेला दावा फेटाळला जाऊ शकतो. 
  • कापून घेतलेली कराची रक्कम योग्य वेळेआधी सरकारकडे जमा केली आहे की नाही, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. 
  • वेतनच्या तपशिलामध्ये मूळ वेतन, भत्ते, इतर लाभ यांचा  दिलेला तपशिल तपासावा. 
  • आयकर अधिनियम ८०सी आणि ८०डी नुसार कापून घेतलेले पैसे आणि केलेल्या गुंतवणकीची आकडेवारी, गुंतवणुकीनुसार मिळालेली कर सवलत, अधिक कर कापून घेतला की नाही हे तपासून घ्यावे. 
  • कधी कधी फॉर्म १६ मध्ये माहिती भरण्यात काही चूक झालेली असू शकते. अशा स्थितीत नियोक्त्याकडून नव्या फॉर्म-१६ ची मागणी करावी. 

 

दोन्ही फॉर्म-१६ चा तपशील जोडावानवी नोकरी पत्करली असल्यास दोन फॉर्म-१६ असतात. कर्मचाऱ्याने आधीच्या कंपनीने दिलेले वेतन, कापून घेतलेला कर आणि दिलेली सवलत याची माहिती नव्या कंपनीला द्यावी. त्यामुळे दुसऱ्या कंपनीला योग्य पद्धतीने कराची रक्कम कापून घेणे शक्य होते. आयटीआरमध्ये दोन्ही फॉर्मचा तपशील जोडावा.

टॅग्स :इन्कम टॅक्स