Join us

जगभरात नोकरकपातीचा दणका सुरूच! सीटबेल्ट उत्पादक ऑटोलिव्ह ८ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 11:01 AM

बायजूस १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेतील नरमाईमुळे कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरूच असून, जगातील सर्वांत मोठी सीटबेल्ट व एअरबॅग्ज उत्पादक कंपनी ऑटोलिव्हने  ८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतातील आघाडीची एज्युटेक कंपनी बायजूसने आणखी १ हजार कर्मचाऱ्यांना काढले आहे.

ऑटोलिव्ह ही स्विडीश कंपनी असून, महागाईच्या पार्श्वभूमीवर खर्च कपातीचा उपाय म्हणून कंपनीकडून कर्मचारी कपात केली जात आहे. यापैकी  ६ हजार कर्मचाऱ्यांना थेट नोकरकपातीचा फटका बसेल, तर २ हजार जणांना अप्रत्यक्ष फटका बसेल, असे कंपनीने म्हटले आहे. या कर्मचारी कपातीमुळे कंपनीचे युरोपातील अनेक प्रकल्प बंद होतील. दरम्यान, व्होल्व्होने मागच्याच महिन्यात १,३०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

यापूर्वीही ५ हजार जणांना काढले

- भारतातील आघाडीची एज्युटेक कंपनी बायजूसने आणखी १ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. ६ महिन्यांपूर्वी कंपनीने ५ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले होते. 

- कंपनीने आपल्या विपणन व्यवस्थापकांना सूचना देऊन २८० ट्युशन सेंटरवरील प्रत्येकी २ विक्री व विपणन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सांगितले आहे. १५० विक्री व्यवस्थापकांनाही आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.

बेरोजगारी सर्वाधिक कुठे? 

नायजेरिया ३३.३% द. अफ्रिका ३२.९% इराक    १५.५५% स्पेन    १३.२६% तुर्की    १०% इराण    ९.७% इटली    ७.८% भारत    ७.८% चीन    ५.३% कॅनडा    ५% ब्रिटन    ३.९%    द. कोरिया २.६% कतार    ०.१%

 

टॅग्स :नोकरी