Join us

जॉब लॉस इन्शोरन्स, नोकरी गेल्यास येणार नाही EMIचं टेन्शन, मिळतील असे फायदे

By बाळकृष्ण परब | Published: December 17, 2020 3:46 PM

Job Loss Insurance News : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच आपली नोकरी जाण्याची चिंता लागलेली असते. अशा परिस्थितीत मध्यमवर्गातील व्यक्तींना अशा पर्यायांची आवश्यकता वाटत असते ज्यांच्या माध्यमातून अचानक येणाऱ्या आर्थिक संकटामध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल.

ठळक मुद्देलॉस ऑफ जॉब/इन्कम इन्श्योरन्स पॉलिसी व्यक्तीला अशा संकटाच्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचे काम करत असते या पॉलिसी बाजारामध्ये जॉब लॉस इन्श्योरन्स कव्हरच्या नावाने उपलब्ध आहेतया विम्यामध्ये नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत

नवी दिल्ली - खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच आपली नोकरी जाण्याची चिंता लागलेली असते. अशा परिस्थितीत मध्यमवर्गातील व्यक्तींना अशा पर्यायांची आवश्यकता वाटत असते ज्यांच्या माध्यमातून अचानक येणाऱ्या आर्थिक संकटामध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल. बहुतांश मध्यमवर्गातील कुटुंबांवर कर्जाचे ओझे असते. तसेच या कर्जाचा मासिक हप्ता ते भरत असतात. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी खूप उपयुक्त ठरू शकते. लॉस ऑफ जॉब/इन्कम इन्श्योरन्स पॉलिसी व्यक्तीला अशा संकटाच्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचे काम करत असते. या पॉलिसी बाजारामध्ये जॉब लॉस इन्श्योरन्स कव्हरच्या नावाने उपलब्ध आहेत. अनेक जनरल इन्श्योरन्स कंपन्या अशा प्रकारच्या पॉलिसी ऑफर करतात.या विम्यामध्ये नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. तसेच दोघांनाही या प्लॅन्सच्या अंतर्गत मिळणारे लाभसुद्धा वेगवेगळे आहेत. नोकरीवरून काढून टाकल्याच्या किंवा कर्मचाऱ्यांची कपात केल्या परिस्थितीत होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या परिस्थितीत इन्श्योरन्स कंपनी तीन महिन्यांपर्यंत विमाधारकाच्या कर्जाचे हप्ते जमा करते.तर अंशत: किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा परिस्थितीत इन्श्योरन्स कव्हर प्राप्त व्यक्तीला साप्ताहिक वेतनाचा लाभ मिळतो. तो लाभ एक लाख रुपये प्रति सप्ताहपर्यंत असू शकतो. हा लाभ ग्राहकाच्या वेतनावर आधारित असतो. तसेच तो कमाल १०० आठवड्यांपर्यंत दिला जातो. काही प्लॅन्स असे आहेत जे गंभीर आजार, अंशत: किंवा स्थायी अपंगत्व किंवा अंशत: अस्थायी अपंगत्वासाठी कव्हरेज देतात. या प्लॅन्सची खरेदी केल्यावर ग्राहकांना आपल्या पॉलिसीसाठी देण्यात आलेल्या प्रीमियमच्या मोबदल्यात इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या कलम ८० अंतर्गत टॅक्समधील सवलतीचा लाभ घेता येऊ शकेल.भारताच्या ऑनलाइन इन्श्योरन्स मार्केटप्लेसने एक नवा विभाग लॉन्च केला आहे त्यामधून तुम्हाला जॉब/इन्कम लॉस इन्श्योरन्स प्रॉडक्ट खरेदी करता येतील. या नव्या सेक्शनमधून एसबीआय जनरल, श्रीराम जनरल, युनिव्हर्सल सॉम्पो आणि आदित्य बिर्ला इन्श्योरन्सकडून देण्यात येणाऱ्या याबाबच्या पॉलिसीची माहिती मिळू शकते.

टॅग्स :नोकरीव्यवसाय