मुंबई: बँकांकडून व्यवसाय, गृह तसेच अन्य कारणांसाठी मंजूर झालेल्या कर्जाच्या फाइल्सचे आता पुनर्मूल्यांकन केले जात आहे. ज्यांची नोकरी गेलीय त्यांना कर्ज देताना त्याची परतफेड करण्याची क्षमता पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार महिन्यात अनेकांची नोकरी गेली असून उद्योगधंदे बसले आहेत. या पार्श्वभूमीवर मार्चपर्यंत ज्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती तसेच कागदोपत्रीही त्याची पूर्तता झाली आहे. त्यांना बँकेकडून फोन अथवा ईमेल करून त्यांची परतफेड करण्याची क्षमता पडताळली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी कर्ज मागण्यात आले असेल तर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पैसे खात्यात क्रेडिट होण्यापूर्वी त्या व्यक्तीची नोकरी शाबूत आहे का? तसेच जर व्यवसाय असेल तर त्यामध्ये त्याला हफ्ते फेडता येतील का, या सगळ्या बाबी आम्ही तपासून पाहत असल्याचेही दुसºया अधिकाºयाने सांगितले.
नोकरी गेली, लोन प्रोसेस करू नका!
बँकांमधून बºयाच फाइल्स परत गेल्या आहेत. कारण लोक स्वत: ब्रँचला येऊन माझी नोकरी गेलीय, त्यामुळे सध्या लोन प्रोसेस करू नका, अशी विनंती करीत आहेत. त्यानुसार बँक त्यांना सहकार्य करत आहेत.
नोकरी, धंदा पुढे सुरू राहीलच ...
सध्या कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामध्ये एखाद्याची जर नोकरी गेली तर तो दुसरी शोधणारच आहे. तसेच आता बसलेला धंदा उद्या जोर पकडणारच आहे. त्यामुळे खातेधारकांनी घाबरून जाऊ नये.