Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय लष्करामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.७ लाखांपर्यंत पगार, अशा आहेत पात्रता आणि अटी-शर्ती 

भारतीय लष्करामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.७ लाखांपर्यंत पगार, अशा आहेत पात्रता आणि अटी-शर्ती 

Indian Army Territorial Army Officer Recruitment 2021: भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:46 PM2021-07-19T12:46:40+5:302021-07-19T12:48:12+5:30

Indian Army Territorial Army Officer Recruitment 2021: भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत.

Job opportunities in Indian Army, Salary up to Rs. 1.7 lakhs, Eligibility and Terms and Conditions | भारतीय लष्करामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.७ लाखांपर्यंत पगार, अशा आहेत पात्रता आणि अटी-शर्ती 

भारतीय लष्करामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.७ लाखांपर्यंत पगार, अशा आहेत पात्रता आणि अटी-शर्ती 

नवी दिल्ली -  भारतीय लष्करामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी टेरिटोरियल आर्मीमध्ये दाखल होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. (Indian Army Officer Recruitment 2021:) या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ ऑगस्ट २०२१ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Indian Army Territorial Army Officer Recruitment 2021)

या भरतीप्रक्रियेमधील महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत 
ऑनलाइन अर्जांची सुरुवात - २० जुलै २०२१
ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख - १९ ऑगस्ट २०२१
ऑनलाइन शुल्क दाखल करण्याची अखेरची तारीख - १९ ऑगस्ट २०२१
लेखी परीक्षेची तारीख - २५ सप्टेंबर २०२१

टेरिटोरियल आर्मीसाठी सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या एकूण पदांचे विवरण देण्यात आलेले नाही. मात्र निवड झालेल्या उमेदवारांना वेतनाच्या रूपात मॅट्रिक्स लेव्हल १० अंतर्गत ५६ हजार १०० रुपये दरमहा पासून ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये दरमहापर्यंत वेतन मिळेल.

या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची पात्रता आणि वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असला पाहिजे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ४२ वर्षांदरम्यान असले पाहिजे. वयाची मोजणी ही १९ ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या वयाच्या आधारे केली जाईल.

या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश शुल्क म्हणून २०० रुपये जमा करावे लागतील. तसेच या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ऊमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून पात्रता सिद्ध करावी लागेल. 

Web Title: Job opportunities in Indian Army, Salary up to Rs. 1.7 lakhs, Eligibility and Terms and Conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.