Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार

नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फी देखील 23 ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:22 PM2020-08-07T18:22:08+5:302020-08-07T18:22:34+5:30

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फी देखील 23 ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकते.

Job opportunities in NABARD; He will get a salary of Rs 3.75 lakh | नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार

नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये तज्ज्ञ सल्लागारांच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासह या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियाही आज सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असणारे उमेदवार नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे सर्व अधिकृत अधिसूचना डाऊनलोड करू शकतात आणि ऑनलाइन अर्जाच्या पेजवर जाऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फी देखील 23 ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकते.

पदासंबंधी तपशील, रिक्त जागा आणि पगाराची माहिती
प्रकल्प व्यवस्थापक - १ पद - दरमहा वेतन ३ लाख
वरिष्ठ विश्लेषक - माहिती सुरक्षा ऑपरेशन्स - १ पद - पगार दरमहा अडीच लाख रुपये
ज्येष्ठ विश्लेषक - नेटवर्क / एसडीडब्ल्यूएन ऑपरेशन्स - १ पद - दरमहा वेतन २.५ लाख रुपये
प्रकल्प व्यवस्थापक - आयटी ऑपरेशन्स / पायाभूत सुविधा सेवा - १ पद - दरमहा वेतन अडीच लाख रुपये
विश्लेषक-सह-मुख्य डेटा सल्लागार - १ पद - दरमहा वेतन ३.७५ लाख
सायबर सिक्युरिटी मॅनेजर (सीएसएम) - १ पद- दरमहा वेतन ३.७५ लाख

अतिरिक्त सायबर सिक्युरिटी मॅनेजर (एसीएसएम) - १ पोस्ट - पगार दरमहा अडीच लाख रुपये
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक - २ पदे - दरमहा वेतन ३ लाख रुपये
जोखीम व्यवस्थापक (क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, कंप्लायंस रिस्क, ईआरएमएस आणि बीसीपी) - ४ पदे, पगार दरमहा २.५ लाख रुपये
नाबार्डमध्ये तज्ज्ञ सल्लागार पदासाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना घाटकोपर किंवा कांदिवली येथील नाबार्ड क्वॉर्टरमध्ये निवास दिले जाणार आहे. निवास उपलब्ध नसल्यास, त्यांना पोस्टनुसार घरगुती भाडे भत्ता (एचआरए) देण्यात येईल. 
 

Web Title: Job opportunities in NABARD; He will get a salary of Rs 3.75 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.