Join us

नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 6:22 PM

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फी देखील 23 ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकते.

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये तज्ज्ञ सल्लागारांच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासह या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियाही आज सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असणारे उमेदवार नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे सर्व अधिकृत अधिसूचना डाऊनलोड करू शकतात आणि ऑनलाइन अर्जाच्या पेजवर जाऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फी देखील 23 ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकते.पदासंबंधी तपशील, रिक्त जागा आणि पगाराची माहितीप्रकल्प व्यवस्थापक - १ पद - दरमहा वेतन ३ लाखवरिष्ठ विश्लेषक - माहिती सुरक्षा ऑपरेशन्स - १ पद - पगार दरमहा अडीच लाख रुपयेज्येष्ठ विश्लेषक - नेटवर्क / एसडीडब्ल्यूएन ऑपरेशन्स - १ पद - दरमहा वेतन २.५ लाख रुपयेप्रकल्प व्यवस्थापक - आयटी ऑपरेशन्स / पायाभूत सुविधा सेवा - १ पद - दरमहा वेतन अडीच लाख रुपयेविश्लेषक-सह-मुख्य डेटा सल्लागार - १ पद - दरमहा वेतन ३.७५ लाखसायबर सिक्युरिटी मॅनेजर (सीएसएम) - १ पद- दरमहा वेतन ३.७५ लाखअतिरिक्त सायबर सिक्युरिटी मॅनेजर (एसीएसएम) - १ पोस्ट - पगार दरमहा अडीच लाख रुपयेअतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक - २ पदे - दरमहा वेतन ३ लाख रुपयेजोखीम व्यवस्थापक (क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, कंप्लायंस रिस्क, ईआरएमएस आणि बीसीपी) - ४ पदे, पगार दरमहा २.५ लाख रुपयेनाबार्डमध्ये तज्ज्ञ सल्लागार पदासाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना घाटकोपर किंवा कांदिवली येथील नाबार्ड क्वॉर्टरमध्ये निवास दिले जाणार आहे. निवास उपलब्ध नसल्यास, त्यांना पोस्टनुसार घरगुती भाडे भत्ता (एचआरए) देण्यात येईल.  

टॅग्स :सरकारी नोकरी