Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

SBI Apprentice Application 2020 : एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे.

By बाळकृष्ण परब | Published: November 20, 2020 12:49 PM2020-11-20T12:49:15+5:302020-11-20T12:50:44+5:30

SBI Apprentice Application 2020 : एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे.

Job opportunities in State Bank of India, bumper recruitment for 8,500 posts | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

Highlightsइच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतीलइच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावाउमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी अप्रेंटीसची संधी दिली आहे. एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या sbi.co.in वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा.

एसबीआय़कडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील.

कुणाला करता येईल अर्ज
एसबीआय अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.

अशी होणार निवड
एसबीआय अप्रेंटिस भरती २०२०२ साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या आधारावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारावर होईल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन लेखी परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली जाईल. ज्यामध्ये जनरल/फायनेंशियल अवेअरनेस, जनरल इंग्लिंश क्वांटिटेटिव्ह एप्टिट्युड आणि रीनजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्युड विषयांमधील एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. तसेच एकूण निर्धारित गुण १०० असतील. लेखी परीक्षेमध्ये ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक परीक्षेसाठी निमंत्रित केले जाईल.
असाअसेल ट्रेनिंग कालावधी आणि स्टायपेंड

एसबीआय अप्रेंटिस भरती २०२० निवड प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्य आणि जिल्ह्यातील ब्रँचमध्ये तैनात करण्यात येईल. अप्रेंटिसचा काळ तीन वर्षांचा असेल. अप्रेंटिसदरम्यान प्रशिक्षितांना पहिल्या वर्षी १५ हजार रुपये दरमहा स्टायपेंड मिळेल. दुसऱ्या वर्षी १६ हजार ५०० आणि तिसऱ्या वर्षी १९ हजार रुपये प्रतिमाह स्टायपेंड मिळेल.

 

Web Title: Job opportunities in State Bank of India, bumper recruitment for 8,500 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.