नवी दिल्ली: ग्रामीण भागात मोठी नोकरभरती निघाली असून, कार्यालय सहाय्यक (बहुउद्देश्य) आणि इतर अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे उद्या अर्जाची मुदत संपणार आहे. आयबीपीएसने कार्यालय सहाय्यक आणि अधिकारी (स्केल १, २, ३)च्या ९६३८ पदांच्या भरती प्रक्रिये(कॉमन रिक्रूटमेंट प्रॉसेस)चं नोटिफिकेशन ३० जून २०२० ला जारी केलं होतं. ज्या उमेदवारांनी अद्याप आयबीपीएस आरआरबी 2020साठी नोंदणी केलेली नाही ते आयबीपीएसच्या ऍप्लिकेशन पोर्टलवर जाऊन ibpsonline.ibps.inवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या सूचनानंनुसार नोंदणी करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख देखील 21 जुलै आहे. उमेदवारांकडे 5 ऑगस्ट 2020पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय असेल.
इच्छुक उमेदवारांनी आयबीपीएस, ibpsonline.ibps.inवर अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठावरच CRP RRBsच्या लिंकवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर नवीन पृष्ठावरील कॉमन रिक्रूटमेंट प्रक्रिया CRP RRBs IXच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. संबंधित भरती प्रक्रियेचं पेज उघडले जाईल, जेथे अधिकृत अधिसूचनांसह विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर उमेदवार अर्ज पोर्टलवर जाऊ शकतात, जेथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना त्यांची नावे, मोबाइल नंबर आणि ईमेल यांसारखी माहिती भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्दाच्या मदतीने उमेदवार संबंधितपदासाठी अर्ज करू शकतील. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड किंवा इतर माध्यमांवर ऑनलाइन पद्धतीनं 850 रुपये विहित अर्ज फी जमा करावी लागणार आहे.
ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज
उमेदवारांनी नोंद घ्यावी की, ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख देखील 21 जुलै आहे. उमेदवारांकडे 5 ऑगस्ट 2020पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय असेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:40 AM2020-07-20T10:40:45+5:302020-07-20T10:41:41+5:30