माँट्रिअल : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरामध्ये सर्व काही बंद पडत असताना हवाई सेवाही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. यामुळे या सेवेवर अवलंबून असलेल्या २५ दशलक्ष नोकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)ने आपल्या नवीन अभ्यासामध्ये हे उघड केले आहे.
यासर्वांना दिलासा देण्यासाठी विविध देशांची सरकारे आणि हवाई सेवा देणाºया कंपन्या यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या बंद असलेल्या हवाई सेवेमुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. मागील वर्षापेक्षा या कंपन्यांच्या व्यवसायामध्ये २५२ अब्ज डॉलरची (म्हणजे मागील वर्षापेक्षा ४४ टक्के कमी) घट होणार आहे. त्यामुळेच या कंपन्यांनी विविध सरकारांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मात्र अद्याप तरी याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. आयएटीएने या कंपन्यांना थेट आर्थिक मदत, कर्ज, कर्जासाठीची गॅरंटी, करामध्ये सवलत अशा विविध सवलती मिळाव्यात म्हणून मागणी केली आहे.
जगभरातील ६५.५ दशलक्ष कुटुंबे ही विमान कंपन्यांवर अवलंबून आहेत. यामध्ये विमान कंपन्यांमध्ये काम करणाºया२.७ दशलक्ष लोकांबरोबरच वाहतूक आणि पर्यटन या उद्योगांमध्ये काम करणाºयांचाही समावेश आहे. आगामी तीन महिने प्रवासावर विविध बंधने अस्तित्वात राहणार असल्याने जगभरातील २५ दशलक्ष लोकांच्या नोकºयांवर टांगती तलवार असल्याचे या अहवालात नमूद करण्यातआले आहे.आशिया प्रशांत क्षेत्राला सर्वाधिक फटकाकोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हवाई वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे ज्या नोकºयांवर टांगती तलवार आहे, त्यामध्ये सर्वाधिक नोकºया या आशिया प्रशांत क्षेत्रामधील आहेत. येथील ११.२ दशलक्ष व्यक्ती या क्षेत्रात काम करीत आहेत. यानंतर युरोप (५.६ दशलक्ष ), लॅटीन अमेरिका (२.९ दशलक्ष), उत्तर अमेरिका आणि आफ्रिका (प्रत्येकी २ दशलक्ष) तर मध्यपूर्वेतील (०.९ दशलक्ष) नोकºयांचा समावेश आहे. आयएटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर डी ज्युनिआक यांनी ही माहिती दिली.