हैदराबाद : इंटरनेटच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली असून, कंपन्यांचे सारे कामही त्यावरच चालते. मात्र, सायबर सिक्युरिटीचे प्रचंड मोठे आव्हानही उभे राहिले आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.
लहान-मोठ्या कंपन्यांसोबतच स्टार्ट अप उद्योजकदेखील आता सायबर सिक्युरिटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहेत. अनेक ग्राहकही स्वत:चा महत्त्वपूर्ण डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी डाटा सिक्युरिटी इंजिनीअरची मदत घेत आहेत. त्यामुळे डाटा सिक्युरिटीच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे, असे तेलंगणा माहिती तंत्रज्ञान असोसिएशनचे संस्थापक सुदीप कुमार मक्थाला यांनी सांगितले.
सायबर सिक्युरिटीची पदवी असणाऱ्यांच्या पगाराची सरासरीही इतर इंजिनीअर्सपेक्षा अधिक आहे. सायबर सिक्युरिटीची पदवी घेणाऱ्या फ्रेशर्सना ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. अन्य क्षेत्रांतील फ्रेशर्सच्या पगाराची मात्र, सरासरी अडीच ते साडेतीन लाख रुपये इतकी आहे. (वृत्तसंस्था)
>नवनवी आव्हाने
सायबर सुरक्षेसाठी स्वयंचलित सायबर सिक्युरिटी यंत्रणा उपलब्ध असली, तरी ती सिक्युरिटीतज्ज्ञांना पर्याय मात्र ठरू शकत नाही. कारण सायबर गुन्हेगारांकडून असलेला धोका दररोज नवनव्या रूपात समोर येत आहे. तो मालवेअर किंवा व्हायरसच्या स्वरूपात असू शकतो. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने नजर ठेवावी लागते, असे एका आघाडीच्या आयटी कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सायबर सिक्युरिटीमध्ये वाढत आहेत नोकऱ्या
इंटरनेटच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली असून, कंपन्यांचे सारे कामही त्यावरच चालते.
By admin | Published: November 3, 2016 06:05 AM2016-11-03T06:05:39+5:302016-11-03T06:05:39+5:30