Join us

इथं तर नोकऱ्याच नोकऱ्या! टीसीएस, इन्फोसिसमधल्या मेगा भरतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:19 AM

वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आलेल्या कपातीनंतर आता आयटी सेक्टरमधून चांगली बातमी आली आहे.

नवी दिल्ली- वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आलेल्या कपातीनंतर आता आयटी सेक्टरमधून चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19मध्ये प्रमुख आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज(टीसीएस) आणि इन्फोसिसनं गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेत 42000हून अधिक नोकरदारांना कामावर रुजू करून घेतलं आहे. अशा प्रकारे या दोन मोठ्या कंपन्यांमधल्या भरतीमध्ये 350 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार मुंबईस्थित मुख्यालयात टीसीएसनं 31 मार्चला आर्थिक वर्ष समाप्त होण्यापूर्वी 29,287 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.तर बंगळुरूतल्या इन्फोसिसमध्ये 24016 सॉफ्टवेअर इंजिनीअरची भरती केली आहे. पीटीआयनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 या दोन्ही कंपन्यांनी 53,303 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तर आर्थिक वर्ष 2017-18मध्ये दोन्ही कंपन्यांनी एकूण 11,500 नव्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतलं आहे.  आर्थिक वर्ष 2017-18मध्ये टीसीएसनं 7,775 कर्मचाऱ्यांना कामावर ठेवून घेतलं होतं. तर इन्फोसिसनं एकूण 3,743 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार, 167 अब्ज डॉलरची भारतीय सॉफ्टवेअर सेवा उद्योग वेगानं प्रगतिपथावर जातोय. 2019मध्ये आयटी कंपन्या डेटा सायन्स, डेटा एनालिसिस, सोल्युशन आर्किटेक्ट्स, प्रोडक्ट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय), ब्लॉकचेन आणि सायबर सिक्युरिटीमध्ये तज्ज्ञ असलेल्यांची आता या कंपन्या भरती करणार आहेत.आयटी क्षेत्रात जवळपास 2.5 लाख नव्या नोकऱ्या उत्पन्न होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मोदी सरकारला रोजगाराच्या मुद्द्यावर लागोपाठ विरोधकांकडून प्रहार सहन करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांचा मोदी सरकारचा कार्यकाळ हा जॉबलेस राहिला आहे. मोदी सरकारनं दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मोदी सरकारला वर्षाला 1 कोटीचं लक्ष्यही गाठता आलेलं नाही. नोकऱ्यांच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या स्कील(कौैशल्य)ची आहे. मोदी सरकारनं तरुणांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे मोदी सरकार मुद्रा लोन सारख्या योजनांचा तरुणांना फायदा होत असल्याचा मोदी सरकार दावा करत आहे. 

टॅग्स :नोकरी