Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jobs: इथे मिळतील जास्त पगाराच्या नोकऱ्या...

Jobs: इथे मिळतील जास्त पगाराच्या नोकऱ्या...

Job Vacancy: आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आज प्रत्येक क्षेत्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रात जास्तीतजास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या आज पाहूया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 12:22 PM2023-06-25T12:22:21+5:302023-06-25T12:22:58+5:30

Job Vacancy: आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आज प्रत्येक क्षेत्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रात जास्तीतजास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या आज पाहूया

Jobs: Here you will find high paying jobs... | Jobs: इथे मिळतील जास्त पगाराच्या नोकऱ्या...

Jobs: इथे मिळतील जास्त पगाराच्या नोकऱ्या...

बिग डाटा इंजिनीअर - विविध सेक्टरमधून जमा केलेल्या डाटाचे अॅनलिसिस, असेसमेंट आणि अॅडमिनिस्ट्रेशन करण्याचे काम बिग डाटा इंजिनिअर्सना करावे लागते. यामुळे एखाद्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी प्रॉडक्टिव्हिटी व रेव्हिन्यू वाढवण्यासाठी योग्यप्रकारे असेसमेंट करण्यात येते.

डाटा सायंटिस्ट : या पदासाठी काम करताना प्रचंड मोठ्या आणि गुंतागुंतीच्या माहितीजालासाठी काम करावे लागते. मशीन लर्निंग आणि अॅक्शनेबल इनसाइट्स या प्रक्रियेसाठी वापरल्या जातात.

एआय कन्सल्टन्ट्स: ग्राहकांना उपयोगी असे स्वयंचलित उपकरण तयार करून देण्यात सहकार्य करणे हे आर्टिफिशियल कन्सल्टन्ट्सचे काम असते. विविध शक्यतांमधून उत्तमोत्तम काम होण्यासाठी ते सतत इंजिनिअर्स आणि इतर तज्ज्ञांशी चर्चा करत असतात.

बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर: आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी किचकट माहिती तपासणे आणि मार्केट तसेच व्यवसायात कोणते ट्रेंड्स सुरु आहेत, याची माहिती घेणे हे यांचे मुख्य काम असते.

कम्प्युटर व्हिजन इंजिनीअर: सवेदनशील माहितीची उकल करणे, त्याचा योग्य अर्थ लावताना संगणकाला मदत करण्यासाठी मशीन लर्निंगआणि कम्प्युटर व्हिजन टेक्निक्सचा वापर करणे, फिल्म्स, फोटोज आणि इतर व्हिजुअल इन्फर्मेशनची ओळख पटवणे व त्याच्या वर्गीकरणासाठी सिस्टम डेव्हलप करताना इतर इंजिनिअर्सबरोबर त्यांना काम करावे लागते.

बिझनेस डेव्हलपमेंट:  वाढीच्या शक्यता, धोरणे विकसित करणे, हे यांचे मुख्य काम. इतर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हजबरोबर ते समन्वयाने काम करतात. सहकार्यासाठी वेगाने पुढे येणाया कंपन्यांवर त्यांची नजर असते.

रिसर्च सायंटिस्ट : आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात रिसर्च सायंटिस्टचे स्थान महत्त्वाचे आहे. ते स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर व्हिजन, लर्निंग टेक्निक्स, मॅथेमॅटिक्स अशा विविध क्षेत्रांचे तज्ज्ञ असतात.

■ संकलन - सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक

Web Title: Jobs: Here you will find high paying jobs...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.