एकीकडे जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या नोकर कपात करत आहेत, तर दुसरीकडे कॅनडाने नोव्हेंबर महिन्यात सर्वच क्षेत्रात दहा हजार नवीन नोकऱ्या दिल्या आहेत. नव्या लेबर फोर्स सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. देशात नवीन नोकऱ्यांमुळे बेरोजगारीचा दर 5.1 टक्क्यांवर आला आहे. दरम्यान रोजगार सहभाग दर 64.8 टक्क्यांपर्यंत घसरला.
एवढी माफक रोजगार वाढ असूनही, डेटावरून असे दिसून आले आहे की, नोव्हेंबरमध्ये सलग सहाव्या महिन्यात कर्मचाऱ्यांचे सरासरी तासाचे वेतन नोव्हेंबर 2021 पासून 5 टक्क्यांपेक्षा जास्त 32.11 डॉलरवर राहिले. याचा अर्थ आगामी काळात नवीन लोकांना अधिक उत्पन्नासह काम करण्याची अधिक संधी मिळणार आहे.
या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या
ज्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या दाखवल्या आहेत, त्यामध्ये फायनान्स, विमा, रिअल इस्टेट, रेंटल आणि लीजिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फॉर्मेशन, कल्चर आणि इंटरटेमेंट यांचा समावेश आहे. गेल्या महिनाभरात या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती दिसून आली आहे. सर्वेक्षणानुसार, नोव्हेंबरमध्ये या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत 21,000 ची वाढ झाली आहे.
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतील नोकऱ्या वाढल्या
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतील रोजगारामध्ये 1.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. अल्बर्टा राज्यातील उद्योगातील रोजगारामध्ये 4.7 टक्के वाढ झाली आहे आणि क्यूबेकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 10,000 पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. दरम्यान, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, घाऊक आणि किरकोळ व्यापारात गेल्या महिन्यात मोठी घसरण झाली आहे.
कन्स्ट्रक्शन्स इंडस्ट्रीतील रोजगारात घट
ऑक्टोबर 2022 मध्ये शेवटच्या लेबर फोर्स सर्व्हेपासून संपूर्ण कॅनडामध्ये कन्स्ट्रक्शन्स इंडस्ट्रीतील रोजगार 1.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापार रोजगार देखील नोव्हेंबरमध्ये घसरला, मे 2022 पासून 4.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. पुढच्या वर्षी सुरुवातीला कॅनडा एक्स्प्रेस एंट्री ड्रॉचे आयोजन करू शकतो.ज्यामुळे विशिष्ट व्यवसायात काम करणार्या परदेशी नागरिकांना किंवा विशिष्ट भाषा कौशल्ये/शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना संधी देता येईल.