Join us  

मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:00 PM

नियमित वेतनावरील (पेरोल) कर्मचाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर २१.८५% अधिक राहिली.

नवी दिल्ली : बेरोजगारीची चिंता वाढत असतानाच एक चांगली बातमी आहे. रोजगारनिर्मिती वाढली असून, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा एका सकारात्मक संकेत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) सप्टेंबर २०२२ मध्ये १६.८२ लाख सदस्य जोडले आहेत. सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत हा आकडा ९.१४ टक्के अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी ९.३४ लाख सदस्य प्रथमच या कक्षेत आले आहेत. सुमारे ५५ टक्के नवे सदस्य असून, त्यापैकी बहुतांश तरुण पंचविशीच्या आतील आहेत.

नवे सदस्य वाढले -- नियमित वेतनावरील (पेरोल) कर्मचाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर २१.८५% अधिक राहिली.- सप्टेंबरमध्ये दाखल झालेल्या १६.८२ लाख सदस्यांपैकी ९.३४ लाख सदस्य प्रथमच ईपीएफओ कक्षेत आले आहेत. - २.९४लाख सदस्य १८ ते २१ या वयोगटातील - २.५४लाख सदस्य हे २१ ते २५ या वयोगटाचे - ५८.७५% - सदस्य १८ ते २५ वयोगटातील 

श्रम मंत्रालयाची आकडेवारी - सुमारे २८६१ नव्या प्रतिष्ठानांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी भविष्य निधी व संकीर्ण तरतूद कायद्याचे पालन सुरू केले आहे. - ७.४९ लाख सदस्य योजनेतून बाहेर पडले; मात्र ईपीएफओने म्हटले की, नव्याने दाखल होणाऱ्या प्रतिष्ठानांद्वारे ते पुन्हा योजनेत आले आहेत. मासिक आधारावर ईपीएफओमधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या मागील महिन्याच्या तुलनेत ९.६५ टक्के घटली आहे. 

टॅग्स :नोकरीकर्मचारीभविष्य निर्वाह निधी