Join us

जॉन डिअर कंपनीने बाजारात आणली ट्रॅक्टरची नवी मॉडेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 3:47 AM

लाँच केलेले ट्रॅक्टर्स ३३ एचपी, ४० एचपी, ४८ एचपी आणि ६३ एचपी (अश्वशक्ती - हॉर्सपॉवर) श्रेणीतील आहेत. यातील ५४०५ गीअर प्रो ६३ एचपी ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन तयार केला आहे

इंदोर : शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध प्रकारच्या उपकरणांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर जॉन डिअर कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे चार ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर आणि इम्प्लिमेंट्सच्या नव्या श्रेणी मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये नुकतीच बाजारात आणली आहे.

लाँच केलेले ट्रॅक्टर्स ३३ एचपी, ४० एचपी, ४८ एचपी आणि ६३ एचपी (अश्वशक्ती - हॉर्सपॉवर) श्रेणीतील आहेत. यातील ५४०५ गीअर प्रो ६३ एचपी ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन तयार केला आहे. यात टिल्ट स्टीअरिंग, १२४ टीएसएस ट्रान्समिशन आदी सुविधा आहेत. शेतीच्या कामांसह लोडर, डोझर म्हणून तसेच माल वाहतुकीसाठी हा उपयुक्त आहे. ४० एचपी श्रेणीत लाँच केलेल्या ५१०५ ट्रॅक्टरमध्ये ४ डब्ल्यूडी (४ व्हिल ड्राईव्ह) पर्याय दिला आहे. इतक्या कमी एचपी श्रेणीत देशात पहिल्यांदाच कंपनीने ४डब्ल्यूडी पर्याय दिला आहे. या क्षमतेमुळे ट्रॅक्टर कोरड्या तसेच दलदलीच्या जमिनीवर मजबुतीने काम करू शकतो. कंपनीने लाँच केलेले ट्रॅक्टर्स इंधन वापरात बचत करणारे, देखरेख खर्च कमी असलेले, खात्रीशीर, खूप टिकाऊ, सुरक्षिततेचे नियम पूर्ण करणारे, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने देशातील शेतकºयांची उत्पादकता वाढवणारे आहेत, असा दावा कंपनीने केला आहे.

यावेळी जॉन डिअरचे व्यवस्थापकीय संचालक सतीश नाडीगर म्हणाले की, गेल्या दोन दशकांत कंपनीने पॉवर स्टीअरिंग, आॅइल इमर्स्ड डिस्क ब्रेक्स, प्लॅनेटरी रिडक्शन आणि फोर्स फीड ल्युब्रिकेशन या मूल्यवर्धित सुविधा बाजारात यशस्वीपणे आणल्या. यातीलअनेक सुविधा जॉन डीअरनेच प्रथम भारतात आणल्या आणि पुढे त्या उद्योगक्षेत्रातील मापदंड ठरल्या आहेत.

कंपनीच्या जनव्यवहार विभागाचे संचालक मुकुल वार्ष्णेय म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतकºयांना शक्तिशाली, कल्पक आणि अतिप्रगत उत्पादने पुरवणे, यावर आमचे लक्ष असते. कंपनीचे ट्रॅक्टरनिर्मितीचे प्लांट इंदोर आणि पुणे येथे आहेत. (वा. प्र)