Lokmat Money > बिझनेस न्यूज > माझ्या मुदतवाढीसंदर्भातल्या बातम्या देऊन पत्रकारांनी आनंद लुटावा - रघुराम राजन

माझ्या मुदतवाढीसंदर्भातल्या बातम्या देऊन पत्रकारांनी आनंद लुटावा - रघुराम राजन

राजन यांनी मात्र यासंदर्भात मौन पाळले असून प्रसारमाध्यमांनी कथित बातम्या देण्याचा आनंद लुटावा असे मिश्किल उद्गार मात्र त्यांनी काढले आहेत

By admin | Published: June 7, 2016 02:03 PM2016-06-07T14:03:09+5:302016-06-07T14:11:54+5:30

राजन यांनी मात्र यासंदर्भात मौन पाळले असून प्रसारमाध्यमांनी कथित बातम्या देण्याचा आनंद लुटावा असे मिश्किल उद्गार मात्र त्यांनी काढले आहेत

Journalists bring joy to the news about my deadline - Raghuram Rajan | माझ्या मुदतवाढीसंदर्भातल्या बातम्या देऊन पत्रकारांनी आनंद लुटावा - रघुराम राजन

माझ्या मुदतवाढीसंदर्भातल्या बातम्या देऊन पत्रकारांनी आनंद लुटावा - रघुराम राजन

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्याच्या पत्रकारपरिषदेत पत्रकारांना व्याजदरांपेक्षा उत्सुकता होती, रघुराम राजन मुदतवाढीबाबत काय बोलतात याची. सप्टेंबरमध्ये राजन यांची मुदत संपत असून त्यांना मुदतवाढ मिळते की नाही याकडे अर्थजगताचे लक्ष लागले आहे. राजन यांनी मात्र यासंदर्भात मौन पाळले असून प्रसारमाध्यमांनी कथित बातम्या देण्याचा आनंद लुटावा असे मिश्किल उद्गार मात्र त्यांनी काढले आहेत.
राजन यांनी खास त्यांच्या शैलीत या अपेक्षित प्रश्नाचा समाचार घेताना म्हटले की, "ज्यावेळी बातमी असेल त्यावेळी तुम्हाला ती मिळेलच. पण सध्या पत्रकारांना याबाबतची वृत्ते देताना जो आनंद मिळतोय तो हिरावून घेणं दुष्टपणाचं ठरेल."
माझ्या मुदतवाढीसंदर्भात सरकार व रिझर्व्ह बँक एकत्रितपणे निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राजन यांना मुदतवाढ मिळावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी तर ऑनलाइन कँपेनही सुरू करण्यात आले असून जवळपास 60 हजार जणांनी सह्या केल्या आहेत.
रघुराम राजन हे यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते शिकागो बुथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अर्थविषयाचे प्राध्यापक होते. मुदतवाढ न मिळाल्यास ते पुन्हा प्राध्यापकपदी रूजू होऊ शकतात. जर काही राजन यांना मुदतवाढ मिळाली नाही, तर 1992 नंतरचे पाच वर्षांची मुदत न मिळालेले ते एकमेव आरबीआय गव्हर्नर ठरतिल.
 
 
मुदतवाढी संदर्भात काय म्हणाले रघुराम राजन? बघा हा व्हिडीयो...

Web Title: Journalists bring joy to the news about my deadline - Raghuram Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.