Join us

सज्जन जिंदाल यांच्या समूहाला सेबीचा झटका, JSW सिमेंटचा IPO रोखला; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 8:19 PM

JSW Group: जेएसडब्ल्यू सिमेंटने 4000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ऑगस्ट 2024 मध्ये सेबीकडे डॉक्युमेंट्स पाठवले होते.

JSW Cement IPO : सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू ग्रुपला मोठा झटका बसला आहे. शेअर बाजार नियामक सेबीने JSW सिमेंटचा (JSW Cement) 4000 कोटी रुपयांचा IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) होल्डवर टाकला आहे. सेबीने JSW सिमेंटचा IPO रोखण्याचे कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही. परंतू, मिळालेल्या माहितीनुसार, कागदपत्रातील त्रुटींमुळे हा पुढे ढकलण्यात आला आहे.

JSW सिमेंट IPO मधून नवीन शेअर्स जारी करुन, तसेच ऑफर फॉर सेल या दोन्ही माध्यमातून निधी उभारण्याची तयारी करत होती. ऑगस्ट 2024 मध्ये कंपनीने IPO ला मंजुरी मिळवण्यासाठी नियामकाकडे कागदपत्रे सादर केली होती. आयपीओमध्ये जमा झालेल्या पैशातून कंपनी राजस्थानमधील नागौर येथे उभारल्या जाणाऱ्या सिमेंट युनिटमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी करत होती. तसेच, आयपीओद्वारे उभारलेल्या रकमेतून कर्जाची परतफेड करण्याचे लक्ष्य होते.

JSW सिमेंटने 60 मिलियन टन उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे, यासाठी JSW सिमेंटचे शेअर बाजारात सूचीबद्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या कंपनीची उत्पादन क्षमता 20.60 दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) आहे. सध्या कंपनीचे देशाच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम राज्यांमध्ये अस्तित्व आहे. पण आता त्याला उत्तर आणि मध्य भारतातही स्थान मिळवायचे आहे. यासाठी कंपनी राजस्थानमधील नागौरमध्ये ग्रीनफिल्ड सिमेंट प्लांट उभारणार आहे. JSW सिमेंटने जुलै 2021 मध्ये खाजगी इक्विटी गुंतवणूकदार अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट आणि सिनर्जी मेटल इन्व्हेस्टमेंट होल्डिंगकडून 1,500 कोटी रुपये उभारले होते.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :सेबीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजार