Join us

GST DAY: केंद्र सरकार जीएसटी दिन करणार साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 7:51 AM

जीएसटी ही करप्रणाली लागू करून एक वर्ष झाल्यानं केंद्र सरकार आज जीएसटी दिन साजरा करणार आहे.

नवी दिल्ली- जीएसटी ही करप्रणाली लागू करून एक वर्ष झाल्यानं केंद्र सरकार आज जीएसटी दिन साजरा करणार आहे. वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ करप्रणालीची वर्षपूर्ती भाजपाकडून देशभरात साजरी केली जाणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर आता वर्षभरात देशभरातील करदात्यांची संख्या 1.20 कोटी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा 9.10 लाख आहे. राज्यातील करदात्यांचा वाटा 7 टक्क्यांवर आला आहे. एकीकडे देशातील जीएसटीदात्यांची संख्या 56 लाखांनी वाढली असताना राज्यातील ही वाढ फक्त 60 हजारांइतकीच आहे.जीएसटी हा वस्तू व सेवा यांच्या उपभोगावर आधारित कर आहे. ज्या भागात खरेदी किंवा मागणी अधिक, अर्थात ग्राहकसंख्या अधिक तेथे हा कर सर्वाधिक आकारला जातो. जीएसटीमध्ये कराचा भरणा ऑनलाइन करावा लागतो. या दोन्हीमध्ये उत्तरेकडील राज्यांची आघाडी आहे. उत्तरेकडील राज्यांमधील व्यावसायिक व व्यापारी जीएसटीपूर्वी मोठ्या प्रमाणात कर कक्षेबाहेर होते. जीएसटीचा भरणा ऑनलाइन करावा लागत असल्याने तेथील व्यापार क्षेत्र मोठ्या प्रमाणात करकक्षेत आले.जीएसटी करप्रणालीनं सरकारच्या तिजोरीवर जास्त भार पडलेला नाही. उलट करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जीएसटी करप्रणालीमुळे महागाई वाढल्याचं समोर आलं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षात न आणल्यामुळे इंधनाचे भावही भडकले आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 30 जून 2017ला खास कार्यक्रमाचे आयोजन करून जीएसटी पर्वाची सुरुवात केली गेली. ‘एक देश एक कर’ अशी जीएसटीमागची संकल्पना आहे.  

टॅग्स :जीएसटी