Join us

जुलैमध्ये १६.५ लाख टन साखर बाजारात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:38 AM

देशात जुलैमध्ये १६ लाख ५० हजार टन साखर बाजारात विक्रीसाठी खुली होणार आहे. याचा कारखानानिहाय कोटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : देशात जुलैमध्ये १६ लाख ५० हजार टन साखर बाजारात विक्रीसाठी खुली होणार आहे. याचा कारखानानिहाय कोटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे.जूनमध्ये सरकारने २१ लाख टन साखर विक्रीसाठी कारखान्यांना परवानगी दिली होती. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे घसरलेले साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना करताना मेच्या अखेरीस साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू करतानाच दर महिन्याला किती साखर खुल्या बाजारात विक्रीसाठी आणावयाची याचा कोटा ठरवून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जून महिन्यासाठी कारखान्यांना २१ लाख टन साखर बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली होती. जुलै महिन्यासाठीचा कोटा जाहीर करताना त्यात साडेचार लाख टनाची कपात करण्यात आली आहे.सध्या पावसाळा सुरू झाला आहे. शीतपेये, आइस्क्रीमची मागणीही कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जुलैसाठीच्या कोट्यात कपात करण्यात आल्याचे समजते.राज्यातील कारखान्यांकडील२ लाख टन साखरेची विक्री नाहीमेच्या अखेरीस सरकारने साखरेचे दर प्रतिक्विंटल २९०० रुपये जाहीर केले. जूनमध्ये २१ लाख टनाचा कोटा असूनही महाराष्ट्रातील कारखान्यांची २९०० रुपये दराने निर्धारित व्रिकी कोट्यातील सुमारे २ लाख टन साखरेची विक्री होऊ शकली नाही. उत्तर प्रदेश, बिहारमधील साखर खरेदी केल्यास व्यापाऱ्यांना वाहतुकीचा खर्च कमी येतो. त्यामुळे तुलनेने ती स्वस्त पडते. परिणामी महाराष्टÑातील कारखान्यांना आपला विक्री कोटा पूर्ण करता आला नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. साखरेच्या किमान विक्रीचा दर उत्तरेतील कारखान्यांपेक्षा महाराष्टÑातील कारखान्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये वाढवून मिळावा, अशी कारखानदारांची मागणी आहे.मे मध्ये २८ लाख टन साखर बाजारात- मेमध्ये कडक उन्हाळा होता. त्यामुळे शीतपेये, आइसक्रीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे साखरेची मागणी ७ लाख टनांनी वाढली होती. त्याचबरोबर, केंद्र सरकार साखरेचे किमान विक्री दर ठरविणार अशी चर्चा होती. त्यामुळे व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी केली होती. परिणामी, २८ लाख टनांहून अधिक साखर बाजारात आली होती.

टॅग्स :साखर कारखाने