Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३१ जुलै आहे ‘डेडलाइन’! ‘ITR’ भरताना ही घ्या काळजी; अन्यथा भरावा लागू शकताे दंड

३१ जुलै आहे ‘डेडलाइन’! ‘ITR’ भरताना ही घ्या काळजी; अन्यथा भरावा लागू शकताे दंड

छाेटीशी चूक महागात पडू शकते आणि ती दुरूस्त करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागताे. अशाच काही महत्त्वाच्या गाेष्टी जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 07:42 AM2023-07-10T07:42:12+5:302023-07-10T07:42:51+5:30

छाेटीशी चूक महागात पडू शकते आणि ती दुरूस्त करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागताे. अशाच काही महत्त्वाच्या गाेष्टी जाणून घेऊया.

July 31st is 'Deadline'! Take care while filing 'ITR'; Otherwise penalty may be payable | ३१ जुलै आहे ‘डेडलाइन’! ‘ITR’ भरताना ही घ्या काळजी; अन्यथा भरावा लागू शकताे दंड

३१ जुलै आहे ‘डेडलाइन’! ‘ITR’ भरताना ही घ्या काळजी; अन्यथा भरावा लागू शकताे दंड

नवी दिल्ली : २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरण (आयटीआर) दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आयकर खात्याकडून विवरण दाखल करण्याबाबतचे एसएमएस करदात्यांना येत आहेत. करदात्यांनी लवकरात लवकर आयकर विवरण दाखल करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर दाखल केल्यास दंड भरावा लागू शकताे. यावर्षी आयकर विवरण भरताना दाेन कररचना विचारात घेऊनच त्यावर निर्णय घ्यावा. विवरण भरताना करदात्यांना काही गाेष्टींची काळजी घ्यायला हवी. छाेटीशी चूक महागात पडू शकते आणि ती दुरूस्त करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागताे. अशाच काही महत्त्वाच्या गाेष्टी जाणून घेऊया.

परदेशातील बॅंक खात्यांची माहिती देणे आवश्यक
परदेशात बॅंक खाते असल्यास त्याची माहिती देणे आवश्यक आहे. याशिवाय परदेशात शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असल्यास आयटीआरमध्ये त्याबाबत माहिती द्यायला हवी. करदात्यांना परदेशातील संपत्तीचीही माहिती देणे आवश्यक आहे.

फाॅर्म 26AS पडताळून पाहा
करदात्यांनी फाॅर्म 26AS डाउनलाेड करावा आणि विविध व्यवहार, उत्पन्न इत्यादींवर कापण्यात आलेल्या कराची माहिती पडताळून घ्यावी. नाेकरदार वर्गाला फाॅर्म 16/16A यांचीही पडताळणी करून बघण्यास सांगण्यात येते. तसे केल्यास विवरण भरताना चूक हाेणार नाही.

याेग्य आयटीआर अर्ज निवडा
आयकर विभागाने अनेक अर्ज दिलेले आहेत. करदात्यांना आपले उत्पन्नाचे स्राेत विचारात घेउन याेग्य अर्ज निवडला पाहिजे. तसे न केल्या आयकर विभागाकडून तुमचे विवरण फेटाळले जाउ शकते आणि रिवाईज्ड विवरण दाखल करण्यास सांगितले जाऊ शकते.

उत्पन्नाची खरी माहिती द्या
विवरण भरताना उत्पन्नाची खरी माहिती द्यावी. चुकीने किंवा हेतूपरस्पर उत्पन्नाच्या स्राेतांबाबतची खरी माहिती न दिल्यास आयकर विभागाकडून नाेटीस दिली जाउ शकते. बचत खात्यातील व्याज, घरभाड्यातून प्राप्त हाेणारे उत्पन्न इत्यादी माहिती द्यावी लागते. कारण हे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येते.

जुन्या आणि नव्या कररचनेतून याेग्य पर्याय निवडा
करदात्यांना विवरण भरताना दाेन पर्याय दिले आहेत. विवरण भरताना उत्पन्न, कर सवलती आणि एकूण भराव्या लागणाऱ्या कराची तुलना करून याेग्य पर्याय निवडावा.

बॅंक खात्याचा तपशील आवश्यक

अनेक जण आपल्या सर्व बॅंक खात्यांची माहिती देत नाहीत. अशा खात्यांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची तसेच मिळणाऱ्या व्याजाची माहिती दिली जात नाही. ही त्रुटी लक्षात आल्यास नाेटीस दिली जाउ शकते. सर्व बॅंक खात्यांची माहिती भरणे बंधनकारक आहे.

आयटीआरचे व्हेरिफिकेशन करा
अनेक जण आयटीआर भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करत नाही. मात्र, व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आयकर खाते तुमच्या विवरणावर पुढील कारवाई करते. व्हेरिफिकेशनसाठी ई-व्हेरिफायची सुविधा आहे. तसेच सीपीसी-बंगळुरू येथे पाठवून देखील व्हेरिफिकेशन करू शकता.

मिळालेल्या भेटवस्तुंची माहितीही गरजेची 
सणासुदीला किंवा इतर कारणांनी जवळचे नातेवाईक महागड्या भेटवस्तू देतात. मात्र, आयकर नियमांनुसार एका वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची भेटवस्तू मिळाली असल्यास त्यावर कर द्यावा लागताे. आयटीआर भरताना याची माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा ही करचाेरी मानली जाईल.

Web Title: July 31st is 'Deadline'! Take care while filing 'ITR'; Otherwise penalty may be payable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.