Join us

अपघातातील जखमी तरुणाचे निधन

By admin | Published: February 20, 2015 1:10 AM

कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्‍या दुसर्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले.

कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्‍या दुसर्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले.
लखमापूरचे तीन युवक सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच-२०-सीके-५९८०) वर सावखेड्याहून लखमापूर येथील घरी परतत असताना रात्री दुसर्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रॅक्टरला मागून धडकले. या अपघातात तीन युवक जखमी झाले होते. जखमींना रात्री उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ज्ञानेश्वर बाहुलेची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर दोन दिवस खाजगी रुग्णालयात उपचार केले. काल पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटीत दाखल करण्यात आले होते. तेथेच त्याची प्राणज्योत मालवली. अंत्यसंस्कार गुरुवारी लखमापूर येथील स्मशानभूमीत झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

टाकळी कोलते येथे विधिसेवा शिबीर संपन्न
बोरगाव अर्ज : माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या वतीने नुकतेच टाकळी कोलते येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात विधिसेवा शिबीर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव त्र्यंबक जाधव व फुलंब्री न्यायालयाचे न्यायाधीश दत्ता झाल्टे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी फुलंब्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वाहेद पटेल होते.
वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. आसाराम लहाने, सचिव ॲड. गजानन व्यवहारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वडोदबाजार पोलीस स्टेशनचे स. पोलीस निरीक्षक दिलीप सागर व नायब तहसीलदार उमाकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक प्रभाकर सुरुंग, सरपंच लताबाई कोलते, उपसरपंच रामदास काकडे व गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपत कोलते होते.
कार्यक्रमात हुंडाबळी, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, अपघात, बालकामगार आदी विषयावर विद्यार्थ्यांनी नाट्य सादर करून समाजाला घातक असणार्‍या घटना किती हानी करतात याची जाणीव करून दिली.
प्रास्ताविक प्रा. अपर्णा कोत्तापल्ले यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. काकासाहेब सुस्ते यांनी केले. आभार भाऊसाहेब साबळे व सुनील पाटील यांनी मानले.