Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ एकदाच प्रीमिअम भरून मिळणार १२ हजार रूपये पेन्शन; जाणून घ्या LIC च्या या खास प्लॅनबद्दल

केवळ एकदाच प्रीमिअम भरून मिळणार १२ हजार रूपये पेन्शन; जाणून घ्या LIC च्या या खास प्लॅनबद्दल

LIC Safe investment : जर तुम्ही सुरक्षित जागी गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका विशेष प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ४० व्या वर्षापासूनच मिळेल पेन्शन.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 02:18 PM2021-10-29T14:18:31+5:302021-10-29T14:18:50+5:30

LIC Safe investment : जर तुम्ही सुरक्षित जागी गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका विशेष प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ४० व्या वर्षापासूनच मिळेल पेन्शन.

just one time investment and earn 12000 rupees per month in this lic policy know how | केवळ एकदाच प्रीमिअम भरून मिळणार १२ हजार रूपये पेन्शन; जाणून घ्या LIC च्या या खास प्लॅनबद्दल

केवळ एकदाच प्रीमिअम भरून मिळणार १२ हजार रूपये पेन्शन; जाणून घ्या LIC च्या या खास प्लॅनबद्दल

जर तुम्ही आपल्यासाठी पेन्शन योजना (Pension Scheme) घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लॅन घेऊन आला आहे. ही पॉलिसी घेताना तुम्हाला केवळ एकाच वेळी प्रीमिअम भरावा लागणार आहे. तसंच यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहिल. या योजनेचं नाव सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) असं आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना एक सिंगल प्रीमिअम प्लॅन आहे. याची सुरुवात १ जुलैपासून होते. जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

LIC सरल पेन्शन योजना दोन प्रकारची आहे. पहिला म्हणजे लाईफ एन्युटी विद १०० पर्सेंट रिटर्न ऑफ परचेस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे जॉईंट लाईफ. सिंगल लाईफमध्ये पॉलिसी एकाच व्यक्तीच्या नावे असेल. पेन्शधारक जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. तसंच त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमिअम मिळेल.

जॉईन्ट लाईफ या योजनेत पती पत्नी या दोघांनाही कव्हर मिळतं. यामध्ये पती आणि पत्नी जे अखेरपर्यंत हयात असतील तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळतं. ज्यावेळी दोघंही नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल. 

काय आहे विशेष?

  • विमाधारकाला पॉलिसी घेतल्यानंतर त्वरीत पेन्शन सुरू होईल.
  • पेन्शन तुम्हाला दर महिन्याला हवं, तिमाही, सहा महिन्यांनी किंवा वर्षानं हवं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल.
  • ही पेन्शन योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारानं घेऊ शकता.
  • या योजनेमध्ये तुम्हाला किमान वर्षाला १२ हजार रूपये पेन्शन मिळेल. यामध्ये गुंतवणूकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. ज्याप्रकारे गुंतवणूक असेल त्याप्रमाणे तुम्हाला पेन्शन मिळेल.
  • ही योजना ४० ते ८० या वयोगटातील लोकांसाठी आहे.
  • या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरू केल्याच्या तारखेच्या सहा महिन्यांनंतर पॉलिसीधारकाला केव्हाही कर्जदेखील मिळू शकतं.

Web Title: just one time investment and earn 12000 rupees per month in this lic policy know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.