Join us

BSNL ची भन्नाट ऑफर! केवळ १ रुपया जादा भरा अन् मिळवा तिप्पट डेटा, उत्तम बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 5:25 PM

फक्त १ रुपया जास्त देऊन केवळ दुप्पटच नाही तर तिप्पट लाभ मिळवू शकता. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: अलीकडील काळात टेलिकॉम कंपन्यातील स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड देत BSNL अनेक उत्तमोत्तम प्लान सादर करत आहे. सरकारी मालकीची नेटवर्क प्रदाता कंपनी भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा जास्त स्वस्त आणि सर्वोत्तम प्रीपेड प्लान्स देत आहेत. BSNL च्या प्लानमध्ये १ रुपया जास्त खर्च केल्यास तुम्हाला दुप्पट-तिप्पट फायदे मिळू शकतात.

BSNL च्या दोन रिचार्ज प्लानमधील फरक फक्त एक रुपयाचा आहे. १ रुपया जास्त देऊन तुम्ही केवळ दुप्पटच नाही तर तिप्पट लाभ मिळवू शकता. BSNL च्या या रिचार्ज प्लानची किंमत २९८ आणि २९९ रुपये आहे. या दोन्ही प्लानच्या किमतीत फक्त १ रुपयांचा फरक आहे. परंतु १ रुपयांच्या या फरकामध्ये तुम्हाला तिप्पट डेटा लाभ मिळू शकतो. 

अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग उपलब्ध

बीएसएनएलचा २९८ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये दररोज १ GB डेटा मिळतो. जेव्हा दैनंदिन डेटा मर्यादा संपते, तेव्हा इंटरनेटचा वेग ४० Kbps पर्यंत घसरतो. या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, EROS NOW एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लान

बीएसएनएलच्या २९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ GB डेटा मिळतो. जेव्हा दैनंदिन डेटा मर्यादा संपते, तेव्हा इंटरनेटचा वेग ८० Kbps पर्यंत घसरतो. तसेच यामध्ये दररोज १०० मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत. प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. याशिवाय, EROS NOW एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे.

दरम्यान, BSNL चा २९९ रुपयांच्या प्लानची किंमत फक्त १ रुपयांनी जास्त आहे. या प्लानमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सारखे इतर सर्व फायदे उपलब्ध आहेत. परंतु दररोज डेटा १ GB ऐवजी ३ GB उपलब्ध आहे. वैधता ५६ दिवसांऐवजी ३० दिवस आहे. जर तुम्हाला दररोज अधिक डेटा हवा असेल तर तुम्ही २९९ रुपयांचा प्लान घेऊ शकता.  

टॅग्स :बीएसएनएल