Lokmat Money > बिझनेस न्यूज > Isro च्या सप्लायरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री; शेअर ४०० रुपयांपार, लिस्ट होताच तुफान तेजी

Isro च्या सप्लायरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री; शेअर ४०० रुपयांपार, लिस्ट होताच तुफान तेजी

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी 400 रुपयांचा टप्पा ओलांडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:30 AM2024-01-16T11:30:43+5:302024-01-16T11:31:04+5:30

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी 400 रुपयांचा टप्पा ओलांडला.

Jyoti CNC Automation IPO Listing Isro s supplier s massive entry into the stock market The share crossed Rs 400, the storm surged as soon as it was listed | Isro च्या सप्लायरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री; शेअर ४०० रुपयांपार, लिस्ट होताच तुफान तेजी

Isro च्या सप्लायरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री; शेअर ४०० रुपयांपार, लिस्ट होताच तुफान तेजी

Jyoti CNC Automation IPO Listing: ज्योती सीएनसी ऑटोमेशनने शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी 400 रुपयांचा टप्पा ओलांडला. ज्योती सीएनसी ऑटोमेशनचे (Jyoti CNC Automation) शेअर्स मुंबई शेअर बाजारावर 12 टक्क्यांहून अधिक प्रीमिअमसह 372 रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीचे शेअर्स सुमारे 11 टक्क्यांनी वाढून 412 रुपयांवर पोहोचले. आयपीओमध्ये, ज्योती सीएनसी ऑटोमेशनचे शेअर्स 331 रुपयांना गुंतवणूकदारांना अलॉट करण्यात आले होते.

40 पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब

ज्योती सीएनसी ऑटोमेशनचा आयपीओ एकूण 40.49 पट सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 27.50 पट सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा कोटा (NII) 38.33 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा 46.37 पट सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या आयपीओला कर्मचारी कॅटेगरीमध्ये 13.14 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहेत.

किती होता प्राईज बँड?

ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या (Jyoti CNC Automation) आयपीओचा प्राईज बँड 315-331 रुपये होता. कंपनीचा आयपीओ 9 जानेवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि तो 11 जानेवारीपर्यंत खुला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करण्याची परवानगी होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये 45 शेअर्स होते. ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या आयपीओची इश्यू साईज 1000 कोटी होती. 

Web Title: Jyoti CNC Automation IPO Listing Isro s supplier s massive entry into the stock market The share crossed Rs 400, the storm surged as soon as it was listed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.