Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market: छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी!

Stock Market: छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी!

शेअर बाजारात चढ- उतार होत असतात. पण नशीब केव्हा पलटेल आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नाही. गुंतवणूकदार कधी पुरते उद्ध्वस्त होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:20 PM2022-07-19T16:20:23+5:302022-07-19T16:21:11+5:30

शेअर बाजारात चढ- उतार होत असतात. पण नशीब केव्हा पलटेल आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नाही. गुंतवणूकदार कधी पुरते उद्ध्वस्त होतात.

jyoti resins and adhesive stock give big return to investors 1 lakh turn 65 crore | Stock Market: छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी!

Stock Market: छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी!

नवी दिल्ली-

शेअर बाजारात चढ- उतार होत असतात. पण नशीब केव्हा पलटेल आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नाही. गुंतवणूकदार कधी पुरते उद्ध्वस्त होतात. तर नशीबानं साथ दिली तर मालामाल. याचंच ताजं उदाहरण म्हणजे Jyoti Resins And Adhesive Ltd च्या शेअरचं देता येईल. या कंपनीचा एक शेअर ३६ पैशांना इशू झाला होता आणि आज या कंपनीचे शेअर असलेले गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. 

एक लाखाचे बनले ६५ कोटी
Jyoti Resins And Adhesive Ltd कंपनीच्या एक शेअरची किंमत २००४ साली केवल ३६ पैसे इतकी होती. पण आज म्हणजेच १९ जुलै २०२२ रोजी एका शेअरची किंमत २,३८० रुपये इतकी झाली आहे. अगदी किरकोळ किमतीत इशू झालेल्या या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना जवळपास ६,६४,८९८ टक्क्यांनी परतावा दिला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या कंपनीच्या शेअर्समध्ये २००४ साली ज्यांनी १ लाख रुपये गुंतवले होते त्यांचे आज ६५ कोटी रुपये झाले आहेत. 

२००४ साली एक रुपयाहून कमी होती किंमत
Jyoti Resins And Adhesive Ltd च्या शेअरची किंमतीचा हिस्टोरिकल डेटा पाहिला तर एप्रिल २००४ साली कंपनीच्या एका शेअरची किंमत ३६ पैसे इतकी होती. दहा वर्षांनंतरही कंपनीच्या स्टॉकमध्ये फारशी काही प्रगती झाली नाही. कारण एप्रिल २०१४ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७.८३ रुपये इतकी होती. पुढे २०१५ पासून कंपनीच्या शेअरनं जी तेजी पकडली त्यानंतर कंपनीनं मागे वळून पाहिलेलं नाही. 

२०१६ नंतर कंपनी मालामाल
एप्रिल २०१५ मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत १३.४० रुपये इतकी होती. त्यानंतर २०१६ मध्ये एकाच वर्षात शेअरच्या किमतीत १०० टक्क्यांनी वाढ झाली आणि एका शेअरची किंमत १०३ रुपये इतकी झाली. जुलै २०२२ उजाडता शेअरची किंमत २,४०१ रुपये इतकी झाली आहे. सध्या कंपनीच्या शेअर किरकोळ तुटीसह २,३८० रुपयांना ट्रेड करत आहे. 

कोरोनात जोरदार कमाई
लक्षवेधी बाब अशी की कोरोना संकट काळात कंपनीच्या स्टॉकनं आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे. मे २०२० मध्ये शेअरची किंमत १११.८० रुपये होती. तीच मे २०२१ मध्ये वाढून थेट ६९७.२५ रुपये इतकी झाली. तर मे २०२२ मध्ये तुफान तेजी नोंदवत एका शेअरनं २३१३.७० रुपये इतका पल्ला गाठला आहे. गेल्या वर्षभरातच कंपनीनं गुंतवणुकदारांना २०० टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

 

Web Title: jyoti resins and adhesive stock give big return to investors 1 lakh turn 65 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.