Join us

केवळ ५ महिन्यांत शेअर बाजार धारातीर्थी; पुढे काय होऊ शकते? तुमचा पैसा सेफ आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:34 IST

कमजोर रुपया, विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत बाजारातून पैसे काढून घेत ते चिनी बाजारपेठेत गुंतविणे सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वकालीन उच्चांकावर गेलेल्या शेअर बाजारात केवळ पाच महिन्यांत मोठी घसरण झाली आहे. ५ महिन्यांत निफ्टी त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून १४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे, तर सेन्सेक्स त्याच्या विक्रमी पातळीपासून १३.२३ टक्क्यांनी खाली आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कमजोर रुपया, विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत बाजारातून पैसे काढून घेत ते चिनी बाजारपेठेत गुंतविणे सुरू केले आहे. याच वेळी कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल आणि जागतिक व्यापारातील वाढता तणाव यामुळे बाजार सतत कोसळत आहे.

बाजार घसरेल की सावरेल?ग्राहक विभाग, वाहन आणि बांधकाम साहित्य यासह प्रमुख क्षेत्रांमधील अपेक्षेपेक्षा वाईट तिमाही अहवाल कंपन्यांच्या नफ्यावर शंका निर्माण करत आहेत. जर कॉर्पोरेट नफा वाढला, जागतिक अर्थव्यवस्था स्थिर झाली तर परिस्थिती सुधारू शकते. मात्र, जागतिक चलनवाढ उच्च राहिल्यास, बाजारातून पैसे काढणे चालू राहिल्यास बाजार आणखी खाली येऊ शकतो.

सर्वाधिक पैसे कोणत्या बाजारातून काढले?भारत    २१८.९ कोटी डॉलर्सतैवान    १११.४ कोटी डॉलर्सब्राझील    २.१ कोटी डॉलर्सइंडोनेशिया    ३८.१ कोटी डॉलर्समलेशिया    ५.९ कोटी डॉलर्सदक्षिण कोरिया    २७.६ कोटी डॉलर्सव्हिएतनाम    २३.५ कोटी डॉलर्सफिलिपीन्स    ५० लाख डॉलर्स

टॅग्स :शेअर बाजार