Lokmat Money > बिझनेस न्यूज > Money Saving Tips: काहकेबो : पैसे वाचवण्याची जपानी पद्धत, वाटा बंद करते, कशी?

Money Saving Tips: काहकेबो : पैसे वाचवण्याची जपानी पद्धत, वाटा बंद करते, कशी?

तुम्ही जास्तीत जास्त बचत करावी, यासाठी प्रेरणादायी मजकूर तुम्हाला समोर सतत दिसत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:14 AM2022-08-03T10:14:34+5:302022-08-03T10:19:42+5:30

तुम्ही जास्तीत जास्त बचत करावी, यासाठी प्रेरणादायी मजकूर तुम्हाला समोर सतत दिसत असतो.

Kahkebo : Japanese way of saving money | Money Saving Tips: काहकेबो : पैसे वाचवण्याची जपानी पद्धत, वाटा बंद करते, कशी?

Money Saving Tips: काहकेबो : पैसे वाचवण्याची जपानी पद्धत, वाटा बंद करते, कशी?

गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय.. सगळ्यांसमोर एकच महाकाय प्रश्न कायम उभा असतो तो म्हणजे, पैसा आणायचा कुठून? काहीही केलं तरी पैसा कमीच पडतो. अलीकडच्या काळात तर हा प्रश्न आणखी बिकट झाला आहे. मग याला पर्याय काय? - पैसा कमवायचा एकच मार्ग अनेकांच्या हातात असतो, तो म्हणजे ‘बचत’ करणं, पैशाला फुटणाऱ्या वाटा कमी करणं; पण कसं करायचं हे? पैशाच्या वाटा बंद करण्याचा एक उत्तम मार्ग जपानी समाजजीवनात वापरला जातो. या युक्तीचं नाव आहे ‘काहकेबो.’ जगभरात अनेक लोक या पद्धतीचा वापर करतात. ही काहकेबो पद्धत आहे तरी काय ?

आपला पैसा जिथे कुठे खर्च होतो, त्याचं आधी चार प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण करायचं. 
१- अत्यावश्यक खर्च- जो खर्च आपण टाळूच शकत नाही असा. उदाहरणार्थ अन्न, पाणी, औषधं, प्रवास..
२- वैकल्पिक किंवा ऐच्छिक खर्च- असा खर्च, जो आपण टाळला किंवा पुढे ढकलला तरी चालू शकतो. उदाहरणार्थ पार्ट्या, वाढदिवस, छंद, शॉपिंग, हॉटेलिंग, पर्यटन..
३- करमणुकीवरील खर्च- या खर्चातही आपण कपात करू शकतो. उदाहरणार्थ नाटक, चित्रपट, टीव्ही चॅनेल्सच्या पॅकेजवरील खर्च..
४- अचानक उद्भवलेला खर्च- हा खर्च आपण अपेक्षित धरलेला नसतो. उदाहरणार्थ, समजा घरातील एखादी अत्यावश्यक वस्तू तुटली, खराब झाली, तर तिची दुरुस्ती किंवा नवी विकत घेणं, घरात कोणाला आलेलं आजारपण, लग्न-वाढदिवसानिमित्त द्यावं लागणारं गिफ्ट..


एकदा का ही यादी तयार झाली की, आपला दरमहा होणारा खर्च त्या त्या रकान्यात भरायचा. दरमहा त्याचा आढावा घ्यायचा. हा खर्च कसा कमी करता येईल, त्याकडे कटाक्षानं लक्ष द्यायचं. 

यात प्रेरणादायी संदेशांचाही समावेश केला जातो. तुम्ही जास्तीत जास्त बचत करावी, यासाठी प्रेरणादायी मजकूर तुम्हाला समोर सतत दिसत असतो. त्यामुळे तुम्ही प्रेरित होता आणि पैशाला फुटणाऱ्या अनावश्यक वाटा बंद करतात. खर्चाला लगाम बसतो आणि ‘पैसा कुठून आणायचा?’ या प्रश्नाची तीव्रताही कमी होते. या पद्धतीमुळे तुमचा जवळपास ३५ टक्के अनावश्यक खर्च वाचू शकतो, असा अनेकांचा अनुभव आहे.
 

Web Title: Kahkebo : Japanese way of saving money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा