सी. ए. उमेश शर्माभाग १९६अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर -१ दाखल करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर आहे. ५ सप्टेंबरलाच गणपती विसर्जन आहे. गणपतीचे आगमन २५ आॅगस्टला झाले, तेव्हा फॉर्म ३बी ची शेवटची तारीख होती आणि ५ सप्टेंबरला विसर्जन आहे तर ती जीएसटीआर-१ शेवटची तारीख आहे. म्हणजे हे १० दिवस जीएसटीमध्येच जाणार आहे. जीएसटीमुळे करदात्यांवर खूप विघ्ने आली आहेत. आता सर्व भक्तांची विघ्ने गणपती बाप्पाच दूर करेल. आपण गणपतीला एवढेच साकडे घालू शकतो, ‘‘गणपती बाप्पा मोरया, जीएसटीची विघ्ने दूर करा.’’अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २५ आॅगस्ट ही जीएसटी ३बी रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख होती तसेच गणपती बाप्पाचे आगमन ही त्याच दिवशी झाले. त्यामुळे काही भक्तगण गणपतीचा जयजयकार करत होते तर काही भक्तगण जीएसटीचा हाहाकार करत होते. आता ५ सप्टेंबर रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे आणि त्याच दिवशी जीएसटीआर-१ भरण्याची अंतिम तारीख आहे तर या जीएसटीआर -१ ची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, गणपतीचे आगमन झालेले आहे. त्याच दिवशी फॉर्म ३बी सुद्धा कसेबसे भरून झाले आहे. फॉर्म दाखल करताना साइटचे, नेटवर्कचे खूप विघ्न आले, परंतु गणपती बाप्पाच्या कृपेने फॉर्म दाखल झाले. आता फॉर्म जीएसटीआर-१ हे जीएसटीचे पहिले रिटर्न दाखल करून जीएसटीचा श्रीगणेशा करूया. फॉर्म जीएसटीआर-१ हा ५ सप्टेंबरपर्यंत दाखल करायचा आहे. जीएसटीआर -१ मध्ये आता मासिक रिटर्न जाणार आहे. हे रिटर्न जीएसटीच्या नेटवर्कवर सामान्य पोर्टलद्वारे भरायचे आहे. जीएसटीआर-१ मध्ये आऊटवर्ड पुरवठ्याची संपूर्ण माहिती द्यावयाची आहे.अर्जुन : कृष्णा, नोंदणीकृत व्यक्तीला केलेल्या करपात्रपुरवठ्याची कोणती माहिती द्यावयाची आहे ?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर -१ मध्ये मागील आर्थिक वर्षातीलएकूण उलाढाल त्याचबरोबर, एप्रिल ते जून, २०१७ मधील एकूण उलाढाल यांची माहिती द्यावयाची आहे. नोंदणीकृत व्यक्तीला केलेल्या पुरवठ्याची इन्व्हाइसनुसार माहिती द्यायची आहे. त्यात प्राप्तकर्त्याची जागा आणि एकात्मिक कर, केंद्रीय कर, राज्य कर व उपकर यांची वेगवेगळी रक्कम यांचीसुद्धा माहिती दाखल करावी लागेल.अर्जुन : कृष्णा, अनोंदणीकृत व्यक्तीला केलेल्या कोणत्या पुरवठ्याची माहिती द्यावी लागेल ?कृष्ण : अर्जुना, अनोंदणीकृत व्यक्तीला केलेल्या पुरवठ्याची माहिती ५ व्या आणि ७ व्या कॉलममध्ये वेगवेगळी द्यावी लागेल. कॉलम ५ मध्ये अनोंदणीकृत व्यक्तीला केलेला आंतरराज्यीय पुरवठा ज्याचे इन्व्हाईस मूल्य रु. २.५ लाखापेक्षा जास्त आहे त्याची संपूर्ण माहिती, तर कॉलम ७ मध्ये अनोंदणीकृत व्यक्तीला केलेला राज्यांतर्गत पुरवठा आणि आंतरराज्यीय पुरवठा ज्याचे इन्व्हाईस मूल्य रु. २.५ लाखापर्यंत आहे याची माहिती द्यावी लागेल.अर्जुन : कृष्णा, आणखी कोणकोणत्या पुरवठ्याची माहिती जीएसटीआर-१ मध्ये द्यावी लागेल ?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-१मध्ये शून्य दरपुरवठा मानीव निर्यात , करमुक्त पुरवठा त्याचबरोबर आउटवर्ड पुरवठ्याची एचएसएन वाईज समरी यांचा तपशील दाखल करावा लागेल.अर्जुन : कृष्णा, अॅडव्हान्सबद्दल काही माहिती जीएसटीआर-१ मध्ये द्यावी लागेल का ?कृष्ण : अर्जुना, हो मिळालेले किंवा समायोजित केलेले अॅडव्हान्स याची माहिती ११ व्या कॉलममध्ये द्यावी लागेल. त्यात आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत पुरवठ्यासाठी मिळालेल्या किंवा समायोजित केलेल्या अॅडव्हान्सची कर दराप्रमाणे माहिती दाखल करावी लागेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने कर कालावधीमध्ये कोणकोणते दस्तऐवजे जारी करावे ?कृष्ण : अर्जुना, करदात्याने जावक पुरवठ्यासाठी इन्व्हाईस, अनोंदणीकृत व्यक्तीद्वारे केलेल्या आवक पुरवठ्यासाठी इन्व्हाईस, रिव्हाईज इन्व्हाईस, डेबिट नोट, क्रेडिट नोट, रिसिट/पेंमेट/ रिफंड व्हाऊचर, डिलेव्हरी चलन ई. दस्तऐवजे जारी करावे.
करनीती - गणपतीचा जयजयकार; जीएसटीचा हाहाकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 2:45 AM