Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनिती भाग-२८८: करदाता रनआउट होईल जीएसटीआर - ९ आणि 2अ मुळे

करनिती भाग-२८८: करदाता रनआउट होईल जीएसटीआर - ९ आणि 2अ मुळे

विक्रेत्याने केलेल्या विक्रीचा तपशील तो त्याच्या जीएसटीआर-१ मध्ये दाखवेल व ती विक्री ज्याची खरेदी असणार, त्याच्या जीएसटीआर - 2अ मध्ये दिसणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:10 AM2019-06-03T04:10:46+5:302019-06-03T04:10:57+5:30

विक्रेत्याने केलेल्या विक्रीचा तपशील तो त्याच्या जीएसटीआर-१ मध्ये दाखवेल व ती विक्री ज्याची खरेदी असणार, त्याच्या जीएसटीआर - 2अ मध्ये दिसणार.

Karanithi Part-288: Taxpayer will run GSTR-9 and 2A due | करनिती भाग-२८८: करदाता रनआउट होईल जीएसटीआर - ९ आणि 2अ मुळे

करनिती भाग-२८८: करदाता रनआउट होईल जीएसटीआर - ९ आणि 2अ मुळे

उमेश शर्मा । सीए

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नुकतेच क्रिकेट एकदिवशीय विश्वकपला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये खेळाडू काही दोष नसताना धावबाद होत आहेत. जीएसटीआर-९ या अ‍ॅन्युअल रिटर्नमध्ये खरेदीविषयी माहिती देतांना करदाता कसा धावबाद होत आहे?

कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन, क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे आणि विश्वकप तर प्रत्येक खेळाडूची परीक्षाच म्हणावी लागेल. जशी जीएसटीआर-९ ही जीएसटीचा वार्षिक व अंतिम परीक्षा आहे. जीएसटीआर-९ आयटीसीची माहिती देण्यासाठी टेबलचा चौकारच मारला आहे, त्यात ही माहिती द्यावयाची आहे. जीएसटीआर-९ मध्ये करदात्यास उपलब्ध असलेला आयटीसी करदाता घेऊ शकत नाही व आयटीसी जास्त घेतल्यास ते व्याजासहित भरावे लागेल. या प्रकारे करदाता आयटीसीसी माहिती देताना धावबाद होत आहे.

अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर - 2अ हे काय आहे?
कृष्ण : अर्जुन, विक्रेत्याने केलेल्या विक्रीचा तपशील तो त्याच्या जीएसटीआर-१ मध्ये दाखवेल व ती विक्री ज्याची खरेदी असणार, त्याच्या जीएसटीआर - 2अ मध्ये दिसणार. उदा. जर ‘अ’ हा विक्रेता आहे व त्याने रु. २,५0,000 चा माल ‘ब’ ला विकला, तर ‘अ’ या विक्रीचा तपशील आपल्या जीएसटीआर-१ मध्ये देईल आणि ते ‘ब’च्या जीएसटीआर - 2अ मध्ये दिसणार. अनेक विक्रेत्यांनी जीएसटीआर १ चुकीचे अथवा भरलेले नाही, त्यामुळे ते खरेदीदारास दिसत नाही. आता वर्ष २0१७-१८ जीएसटीआर-९ भरताना हीच प्रमुख अडचण होत आहे. या प्रकारे एकाची चूक दुसऱ्याला रनआउट करत आहे.

अर्जुन: कृष्णा, जर 2अ मध्ये दिसणारा आयटीसी घेतलेल्या आयटीसीपेक्षा जास्त असल्यास काय करावे?
कृष्ण : अर्जुना, जर 2अ मध्ये दिसणारा आयटीसी आपण घेतलेल्या आयटीसीपेक्षा जास्त असल्यास करदाता तो आयटीसी घेऊ शकतो. जर करदात्याने तो आयटीसी २0१८-१९च्या रीटर्नमध्ये घेतला असेल, तर करदाता तो आयटीसी घेऊ शकतो. उदा. जर 2अ मध्ये सहा लाख रुपये आयटीसीचा दिसत आहे आणि आणि आपण पाच लाख रुपयांचा आयटीसी घेतला आहे, तर करदाता उर्वरित एक लाख रुपयांचा आयटीसी घेऊ शकतो, जर करदात्याने तो आयटीसी २0१८-१९च्या ३ बी घेतला असेल तर.

अर्जुन : कृष्णा, जर 2अ मध्ये दिसणारा आयटीसी घेतलेल्या आयटीसीपेक्षा कमी असल्यास काय करावे?
कृष्ण : अर्जुना, हा प्रश्न खरच अनुत्तरित आहे, याबाबतची सूचना अत्यंत त्रासदायक आणि गैरजरूरी आहे, असं वाटत. उदा. जर 2अमध्ये आठ लाखांचा दिसत आहे आणि आपण रु. दहा लाखांचा आयटीसी घेतला आहे, येथे करदात्यांनी रु.दोन लाखांचा आयटीसी जास्त घेतला आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वच प्रतीक्षा करत आहेत. करदाता हा रु. दोन लाखांचा आयटीसी घेऊ शकतो, पण त्यासाठी कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. कारण अधिकारी ‘पंच’ कधीही मैदानावर उतरू शकतात आणि करदात्याला धावबाद करू शकतात.

अर्जुन : कृष्णा, आयटीसी खरेदीची माहिती देताना अजून कोणकोणत्या अडचणी येणार आहेत व यातून करदात्यांनी काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९मध्ये करदात्याला आयटीसीची विभागणी कॅपिटल गुडस, इनपूट व इनपूट सर्व्हिसेसमध्ये करवायची आहे, पण ३ बी बनविताना करदात्याने या मागणीनुसार माहिती एकत्रित केली नव्हती. त्यामुळे ही माहिती पुरविणे करदात्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरेल. एसएसएननुसार माहितीही पुरवायची आहे. या मागणीने करदात्यांच्या अडचणी अजून वाढविल्या आहेत. जीएसटीआर-९ मध्ये करदात्याला २0१७-१८ मध्ये उपलब्ध असलेला आयटीसी व त्याने २0१८-१९ मध्ये घेतला असेल, तर त्याचीही माहिती द्यावयाची आहे. ही माहिती पुरविताना करदाता हिट विकेट होणार आहे.

Web Title: Karanithi Part-288: Taxpayer will run GSTR-9 and 2A due

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर