Lokmat Money > बिझनेस न्यूज > Yes Bankपाठोपाठ आणखी एका बँकेचे ग्राहक अडचणीत; MD म्हणे, पैशांचा तुटवडा नाही

Yes Bankपाठोपाठ आणखी एका बँकेचे ग्राहक अडचणीत; MD म्हणे, पैशांचा तुटवडा नाही

Karnataka Bank: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक बँकेच्या अडचणींमध्येही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही दडपणाखाली आलेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:45 AM2020-03-12T10:45:48+5:302020-03-12T10:51:26+5:30

Karnataka Bank: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक बँकेच्या अडचणींमध्येही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही दडपणाखाली आलेले आहेत.

Karnataka Bank customer in trouble after Yes Bank crisis vrd | Yes Bankपाठोपाठ आणखी एका बँकेचे ग्राहक अडचणीत; MD म्हणे, पैशांचा तुटवडा नाही

Yes Bankपाठोपाठ आणखी एका बँकेचे ग्राहक अडचणीत; MD म्हणे, पैशांचा तुटवडा नाही

Highlights Yes Bank बँकेवर आरबीआयनं लादलेल्या निर्बंधानंतर अनेक ग्राहकांची तारांबळ उडालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक बँकेच्या अडचणींमध्येही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही दडपणाखाली आलेले आहेत. कर्नाटक बँकेतल्या खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत. आमच्याकडे पर्याप्त स्वरूपात पैसे आहेत.

नवी दिल्लीः Yes Bank बँकेवर आरबीआयनं लादलेल्या निर्बंधानंतर अनेक ग्राहकांची तारांबळ उडालेली आहे. या संकटामुळे इतर बँकांचे ग्राहकही काहीसे घाबरलेले आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवाही पसरवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक बँकेच्या अडचणींमध्येही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही दडपणाखाली आलेले आहेत. परंतु बँकेनं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं लोकांना आवाहन केलं आहे.
 
कर्नाटक बँकेतल्या खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत. आमच्याकडे पर्याप्त स्वरूपात पैसे आहेत. त्यामुळे कर्नाटक बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाबलेश्वर एम. एस यांनी सांगितलं आहे. आम्ही बँकेच्या धोरणांतर्गत आरबीआयनं दिलेल्या ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करून ठेवलेले आहेत. ऑडिट रिपोर्टनुसार, 31 मार्च 2019मध्ये बँकेत जमा असलेल्या पैशांची सरासरी 13.17 टक्के होती. 

Yes Bank: येस बँकेच्या पतनात रिझर्व्ह बँकेची भूमिका संशयास्पद

बँक 96वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून अस्तित्वात आहे आणि देशभरातील 1.1 कोटींहून अधिक ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. बँकेचा पायासुद्धा मजबूत आहे. बँकेजवळ पर्याप्त रक्कम असून, बँकेचा व्यवसायही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे बँक तोट्यात असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. टीव्हीवर किंवा सोशल मीडियावरून बँकेविषयी भ्रामक बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे शक्यतो ग्राहकांना त्याकडे दुर्लक्ष करावं, असंही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाबलेश्वर एम. एस म्हणाले आहेत. कर्नाटक बँकेच्या आधी आरबीएल बँक आणि करुर वैश्य बँकेनंदेखील अशा प्रकारच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. 

येस बँकेस पुनरुज्जीवन योजनेची आरबीआयकडून लवकरच घोषणा?

दरम्यान, Yes Bankला पुनर्जीवित करण्यासाठी एसबीआय आणि इतर बँकांच्या वचनबद्धतेची रिझर्व्ह बँकेकडून लवकरच घोषणा करण्यात येऊ शकते. घोषणेनंतर २४ तासांच्या आत या बँका २० हजार कोटी रुपये भागभांडवली आधाराच्या (इक्विटी बेस) स्वरूपात येस बँकेत ओततील. तिसऱ्या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील बँका ठेव प्रमाणपत्रांत (सर्टिफिकेटस् ऑफ डिपॉझिट्स) ३० हजार कोटी रुपये गुंतवतील. त्यानंतर, चौथ्या दिवशी येस बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक व्यवहारांवरील निर्बंध (मोरॅटोरियम) उठविले जातील. गुंतवणूकदार बँकांकडून होकार मिळताच या योजनेची कुठल्याही क्षणी घोषणा केली जाऊ शकते.

Web Title: Karnataka Bank customer in trouble after Yes Bank crisis vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.