Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी प्रश्नामध्ये कर्नाटक सरकार करणार मध्यस्थी

आयटी प्रश्नामध्ये कर्नाटक सरकार करणार मध्यस्थी

आयटी कंपन्यांच्या नोकर कपातीत लक्ष घालण्याचे आश्वासन या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेला कर्नाटक सरकारने दिले आहे

By admin | Published: June 2, 2017 01:33 AM2017-06-02T01:33:39+5:302017-06-02T01:33:39+5:30

आयटी कंपन्यांच्या नोकर कपातीत लक्ष घालण्याचे आश्वासन या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेला कर्नाटक सरकारने दिले आहे

Karnataka government intervenes in IT question | आयटी प्रश्नामध्ये कर्नाटक सरकार करणार मध्यस्थी

आयटी प्रश्नामध्ये कर्नाटक सरकार करणार मध्यस्थी

बंगळुरू : आयटी कंपन्यांच्या नोकर कपातीत लक्ष घालण्याचे आश्वासन या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेला कर्नाटक सरकारने दिले आहे. आॅल इंडिया आयटी एम्प्लॉईज असोसिएशनच्या प्रतिनिधींची आपण लवकरच भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊ, असे कर्नाटकचे आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी सांगितले. नोकर कपातीचा फटका बसलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी श्रम मंत्रालयाकडे रीतसर तक्रार नोंदवावी, असे खरगे यांनी याआधी कर्मचाऱ्यांना सांगितले होते.
असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद मुकिमुद्दिन यांनी खरगे यांना एक ई-मेल पाठवून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याची विनंतीही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खारगे यांनी वरील वक्तव्य केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Karnataka government intervenes in IT question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.