Join us

एच१बी व्हिसापासून भावना वेगळ्या ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:52 AM

व्हिसाचा विचार करता वस्तुस्थितीपासून भावना वेगळ्या ठेवणे महत्त्वाचे आहे, असे नॅसकॉमचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांनी म्हटले.

नवी दिल्ली - व्हिसाचा विचार करता वस्तुस्थितीपासून भावना वेगळ्या ठेवणे महत्त्वाचे आहे, असे नॅसकॉमचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांनी म्हटले. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच१बी वर्क व्हिसाची अतिशय कठोर केलेली छाननी आणि कर्मचाऱ्यांतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर प्रेमजी रविवारी मुलाखतीत म्हणाले, दरवर्षी ६५ हजार एच१बी व्हिसा दिले जातात व भारतीय माहिती व तंत्रज्ञान उद्योग त्यातील दहा हजारांपेक्षाही कमी वापरतो. व्हिसातील ७० टक्के व्हिसा भारतीयांना जातात, परंतु ते भारतीय कंपन्यांना जात नाहीत. ही बाब खूप म्हणजे खूप दाद देण्यासारखी आहे. अमेरिकन श्रम विभागाच्या अंदाजानुसार २०२० पर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित बुद्धिमत्तेत २.४ दशलक्ष लोकांची टंचाई असेल व यातील निम्मे मनुष्यबळ हे संगणक व माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवांशी संबंधित असेल.

टॅग्स :अमेरिकाव्हिसाभारत