Join us

पैसे तयार ठेवा, ३० जूनपासून मिळणार 'या' IPO मध्ये गुंतवणूकीची संधी; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 1:51 PM

या कॅलेंडर वर्षाची पहिली तिमाही संपणार आहे. दरम्यान, सध्या आयपीओ मार्केटमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत.

येता आठवडा शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी कमाईचा ठरू शकतो. शेअर बाजारात काही आयपीओ खुले होणार आहेत. पुढील आठवडा अनेक कंपन्यांच्या आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, हॉस्पिटॅलिटी आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेसशी संबंधित असलेल्या पीकेएच व्हेंचर्सच्या आयपीओचाही (PKH Ventures IPO) समावेश असेल. कंपनीचा आयपीओ (IPO) ३० जून २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि ४ जुलै २०२३ रोजी बंद होईल.

आयपीओशी संबंधित महत्त्वाच्या बाबीया कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात म्हणजेच ३० जून २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. कंपनीच्या आयपीओसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जुलै २०२३ असेल. कंपनी ७ जुलैपर्यंत शेअर्सचे वाटप पूर्ण करेल. हे शेअर्स ११ जुलैपर्यंत यशस्वी बोलीदारांच्या डिमॅट खात्यात क्रेडिट होतील. त्याच वेळी, १२ जुलै २०२३ रोजी कंपनीचे स्टॉक्स शेअर बाजारात लिस्ट होऊ शकतात.

या आयपीओ अंतर्गत कंपनी १८,२५८,४०० नवे शेअर्स जारी करेल. तर कंपनीचे प्रमोटर प्रवीण कुमार अग्रवाल ७,३७३,६०० शेअर्स जारी करतील. यावेळी कंपनीत अग्रवाल यांचा हिस्सा ६३.६९ टक्के आहे. नवे शेअर जारी केल्यानंतर मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीची सबसिडायरी हलायपानी हायड्रो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी केलं जाणार आहे. याशिवाय कंपनी जमवलेल्या रकमेचा हिस्सा गरुड कन्स्ट्रक्शनमध्येही गुंतवणार आहे. गरुड कॅपिटलच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही गुंतवणूक केली जाईल. आयडीबीआय कॅपिटलय या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. दरम्यान, कंपनीवर डिसेंबर २०२२ पर्यंत एकूण २४१.०३ कोटी रुपयांचं कर्ज होतं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूकपैसा