Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठी गुंतवणूक वा खरेदी जरा जपूनच, तपशील जपून ठेवा; कधीही येऊ शकते नोटीस

मोठी गुंतवणूक वा खरेदी जरा जपूनच, तपशील जपून ठेवा; कधीही येऊ शकते नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:59 AM2017-09-13T00:59:04+5:302017-09-13T00:59:04+5:30

Keep a note of big investments or purchases, except for a few; Notice can occur at any time | मोठी गुंतवणूक वा खरेदी जरा जपूनच, तपशील जपून ठेवा; कधीही येऊ शकते नोटीस

मोठी गुंतवणूक वा खरेदी जरा जपूनच, तपशील जपून ठेवा; कधीही येऊ शकते नोटीस

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : आपले उत्पन्न २.५0 लाख अथवा त्यापेक्षा कमी म्हणजे करपात्र नसले तरी प्राप्तिकर विभागाची नोटीस कधीही आपल्या हाती पडू शकते. घर अथवा कारची खरेदी, शेअर बाजारात मोठ्या रकमेची गुंतवणूक आदी व्यवहारांवर मोदी सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

तुमचा व्यवहार तुमच्या उत्पन्नाच्या आकड्यांशी
सुसंगत नाही, असा जरासाही संशय प्राप्तिकर विभागाला आल्यास हा पैसा तुमच्याकडे कुठून आला, त्यावर प्राप्तिकर भरलाय काय? असे प्रश्न नोटीस पाठवून तुम्हाला हमखास विचारले जातील.
वर्षभरात म्युचुअल फंडात १0 लाख रुपये वा त्याहून रक्कम तुम्ही गुंतवल्यास, त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला लगेच मिळते. या गुंतवणुकीचे तपशील सर्वप्रथम प्राप्तिकर विभाग तुमच्या वार्षिक विवरण पत्राशी पडताळून पाहील. यानंतर या रकमेचा स्रोत काय? त्यावर तुम्ही प्राप्तिकर भरला काय? असे प्रश्न नाटिसीद्वारे तुम्हाला विचारण्यात येतील.

तार्किक उत्तर मात्र हवे
मात्र मोठ्या रकमेच्या व्यवहारामुळे नोटीस आल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. घर वा कारची खरेदी कर्ज काढून केली असेल तर त्याचे तपशील तुम्हाला लगेच सादर करता येतील.
त्याचबरोबर अनेक वर्षांच्या बचतीतून दागदागिने वा एखाद्या मिळकतीची खरेदी केली असेल, तर बचतीची रक्कम आपल्याकडे कोणत्या उत्पन्नस्रोतांद्वारे आली, त्याचा पुरावा सादर करावा लागेल.
पुरावा उपलब्ध नसल्यास तुमचा पगार किती होता, त्यातून वा व्यावसायिक उत्पन्नातून ही बचत कशी केली, त्याचे तार्किक उत्तर प्राप्तिकर विभागापुढे सादर करावे लागेल इतकेच.
एकाच वेळी दोन लाख वा त्याहून अधिक रकमेच्या दागदागिन्यांची अथवा जडजवाहिºयाची खरेदी अथवा कार खरेदी केली तरी त्या व्यवहारांसाठी पॅन कार्डचे तपशील देणे बंधनकारक आहे.
आपले उत्पन्न नेमके किती व हे व्यवहार आपण कोणत्या रकमेतून केले, याची चौकशी करण्याचे अधिकार प्राप्तिकर विभागाला आहेत.

Web Title: Keep a note of big investments or purchases, except for a few; Notice can occur at any time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.