Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती

पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती

जर तुम्ही आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:28 AM2023-07-21T11:28:12+5:302023-07-21T11:28:35+5:30

जर तुम्ही आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ.

Keep your money ready Yatharth Hospital IPO coming on 26th July See all information including price bands market risk stock market investment | पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती

पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती

जर तुम्ही आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच 26 जुलैला एक कंपनी तिचा IPO घेऊन येत आहे. ही कंपनी यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेड (Yatharth Hospital IPO) आहे. हा आयपीओ 26 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. 28 जुलैपर्यंत गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतील. 

कंपनीनं आपल्या आयपीओसाठी 285 रुपये ते 300 रुपये प्रति इक्विटी शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. अँकर गुंतवणूकदारांचा यात मंगळवारपासून म्हणजेच 25 जुलैपासून अर्ज करता येणार आहे. या इश्यू अंतर्गत, कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक 6,551,690 शेअर्स ऑफर करतील. यापूर्वीही अनेक कंपन्यांचे आयपीओ लाँच झाले आहेत. यापैकी काही ठिकाणी गुंतवणूकदारांनी बंपर नफाही कमावला आहे.

या दिवशी होणार लिस्टिंग

2 ऑगस्ट 2023 रोजी शेअर्सचं वाटप होईल. 3 ऑगस्ट 2023 पासून रिफंड इश्यू सुरू होईल. यथार्थ हॉस्पिटलचे शेअर्स पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात 4 ऑगस्टपर्यंत जमा केले जातील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 7 ऑगस्टपर्यंत करता येईल. प्रत्येक इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति इक्विटी शेअर इतकी निश्चित करण्यात आलीये. कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के इश्यू राखून ठेवला आहे. त्याच वेळी, 50 टक्के शेअर्स क्युआयबीसाठी म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स आणि 15 टक्के एनआयआय किंवा एचएनआयसाठी राखीव ठेवण्यात आलेत.

२००९ मध्ये सुरुवात

यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस, एक मल्टी-केअर हॉस्पिटल चेन कंपनी, 2008 मध्ये सुरू करण्यात आली. दिल्ली-एनसीआरमधील टॉप-10 खासगी रुग्णालयांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांची दिल्ली-एनसीआरमध्ये 3 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, जी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि नोएडा एक्स्टेंशनमध्ये आहेत. नोएडा एक्स्टेंशन हॉस्पिटलमध्ये 450 बेड्स आहेत.

या आयपीओ अंतर्गत, कंपनी 490 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. याद्वारे कंपनी एकूण 686.55 कोटी रुपये उभारणार आहे. अजय कुमार त्यागी आणि कपिल कुमार हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Keep your money ready Yatharth Hospital IPO coming on 26th July See all information including price bands market risk stock market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.