गेल्या वर्षी सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर अनेकांना एकापेक्षा अधिक सिमाकार्ड सुरू ठेवणं कठीण झाले आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे. तसंच यासोबत एकूण 30 दिवसांची वैधताही देण्यात येत आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचा २० रूपयांचा प्लॅन संपूर्ण महिनाभर सिम सुरू ठेवण्यास तुमची मदत करेल. एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांसारख्या कंपन्यांचे कमीत कमी प्लॅन्स ५० रुपयांचे आहेत.
20 रुपयांपेक्षा कमी बीएसएनएल प्लॅनची किंमत 19 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. हा प्लॅन कंपनीच्या VoiceRateCutter 19 म्हणून ओळखला जातो. हा प्लॅन तुमचे सिम सक्रिय ठेवेल. यामध्ये ऑन-नेट आणि ऑफ-नेट कॉलचा दर 20 पैसे प्रति मिनिट ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्याचा कॉल रिसिव्ह करू शकाल आणि इतर सेवांचाही लाभ घेऊ शकाल. ग्राहकांकडे कोणताही डेटा प्लॅन किंवा मोबाईल रिचार्ज नसला तरी त्यांना याचा लाभ घेता येऊ शकेल.
सध्या बीएसएनएल ही कंपनी केवळ 3जी सेवा देत आहे. तर अन्य कंपन्या 4जी सेवा पुरवत आहे. लवकरच बीएसएनएलदेखील आपल्या 4जी सेवा सुरू करणार आहे.