Lokmat Money > बिझनेस न्यूज > खात्यात लाख रुपये ठेवणे नुकसानकारक

खात्यात लाख रुपये ठेवणे नुकसानकारक

स्टेट बँक ऑफ इंडियामधील बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते, कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:34 AM2019-04-20T04:34:00+5:302019-04-20T04:34:08+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियामधील बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते, कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत.

Keeping lakhs of money in account is harmful | खात्यात लाख रुपये ठेवणे नुकसानकारक

खात्यात लाख रुपये ठेवणे नुकसानकारक

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामधील बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते, कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत.
स्टेट बँकेने १ मेपासून व्याज दर निश्चित करण्यासाठी ‘एक्सटर्नल बेंच मार्किंग’ पद्धत स्वीकारायचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत बँकेचा मुख्य व्याज दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडल्या जातो, त्यामुळे रेपो रेट कमी/जास्त झाल्यास व्याज दरही कमी/जास्त होतो.
४ एप्रिलच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केली आहे त्यामुळे व्याजदर कमी होणार आहे.
कर्जावरील व्याजामध्ये स्टेट बँकेने १० एप्रिल रोजी ०.०५ टक्के कपात केली आहे, तसेच ३० लाखापर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्के कपात केली आहे.
त्यामुळे ग्राहकांना स्टेट बँकेच्या ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ८.५० टक्के ते ८.९० टक्के व्याज द्यावे लागेल.
काय आहे निर्णय?
याचबरोबर बचत खात्यावरील व्याज दरात १ मेपासून कपात करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे. त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक रकमेवरील व्याज दर रेपो रेटपेक्षा २.७५ टक्क्यांनी कमी राहील. सध्या रेपो रेट ६ टक्के आहे म्हणजे बचत खात्याचा दर ३.२५ टक्के राहील, तर एक लाखापेक्षा कमी रकमेवर ३.५० टक्के व्याज मिळेल. एक्सटर्नल, बेंच मार्किंग पद्धत स्वीकारणारी स्टेट बँक ही पहिली बँक आहे. भविष्यात इतर बँकाही ही पद्धत स्वीकारू शकतात.

Web Title: Keeping lakhs of money in account is harmful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय