Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द

अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द

अदानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती गौतम अदानी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 08:07 PM2024-11-21T20:07:45+5:302024-11-21T20:19:16+5:30

अदानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती गौतम अदानी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

Kenya cancels 700 million dollars deal with Adani Group decision after allegations in US | अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द

अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द

Adani Group Crisis : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि अब्जावधी डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या कथित फसवणुकीमध्ये अदानींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच अदानींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आता अदानी समूहाच्या हातून एक मोठी आंतरराष्ट्रीय डील गेली आहे.

केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी आपल्या देशातील मुख्य विमानतळाचा विस्तार करण्याची योजना रद्द केली आहे. भारतातील अदानी समूहानेही या प्रकल्पासाठी बोली लावली होती. रुटो यांनी अदानी समूहासोबतचा ७०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा करार रद्द केला आहे. हा करार वीज वाहिन्यांच्या बांधकामासाठी होता. त्यामुळे अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे.

भारतातील सौरऊर्जा करार मिळवण्यासाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २,२०० कोटी) लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन वकिलांनी केला आहे. या वृत्तानंतर अदानी समूहाचे जवळपास सर्वच शेअर्स आज प्रचंड घसरले आहेत. अशातच अदानी समूहाला केनियामधून आणखी एक मोठा धक्का बसला. 

"मी परिवहन मंत्रालय आणि ऊर्जा आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत यंत्रणांना सध्या सुरू असलेला करार त्वरित रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तपास यंत्रणा आणि भागीदार देशांनी प्रदान केलेल्या नवीन माहितीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात येत आहे," असे रुटो यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. ऑक्टोबरमध्ये अदानी एनर्जी सोल्युशन्सने केनिया इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन कंपनीसोबत ७३६ दशलक्ष डॉलर किमतीचा ३० वर्षांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी करार केला होता. न्यायालयाने त्याच महिन्यात करार स्थगित केला होता.
 

Web Title: Kenya cancels 700 million dollars deal with Adani Group decision after allegations in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.