Lokmat Money > बिझनेस न्यूज > अडीच रुपयांनी केरोसिन महागण्याचे संकेत!

अडीच रुपयांनी केरोसिन महागण्याचे संकेत!

केरोसिनच्या किमती आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या केरोसिनच्या अनुदानाच्या रकमेचा आढावा घेण्यासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली असून

By admin | Published: July 10, 2015 01:11 AM2015-07-10T01:11:00+5:302015-07-10T01:11:00+5:30

केरोसिनच्या किमती आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या केरोसिनच्या अनुदानाच्या रकमेचा आढावा घेण्यासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली असून

Kerosene signals two-and-a-half rupees! | अडीच रुपयांनी केरोसिन महागण्याचे संकेत!

अडीच रुपयांनी केरोसिन महागण्याचे संकेत!

मुंबई : केरोसिनच्या किमती आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या केरोसिनच्या अनुदानाच्या रकमेचा आढावा घेण्यासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली असून चालू आर्थिक वर्षाकरिता प्रति लिटर १६ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी अनुदानाची रक्कम १८ रुपये ५१ पैसे होती. त्यात आता सुमारे अडीच रुपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी, केरोसिनच्या किमती अडीच रुपयांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्यावर्षभरामध्ये केरोसिनच्या बाजारपेठीय किमतीत मोठे चढउतार झाले. परंतु, साडे अठरा रुपयांच्या भरीव अनुदानामुळे त्या किमतीमध्ये स्थैर्य राखण्यात सरकारला यश आले होते. परंतु, आता ही रक्कम अडीच रुपयांनी कमी केली आहे. सध्या बाजारातील केरोसिनच्या किमतीचा ट्रेन्डही घसरणीचा आहे. परंतु, त्यात भाववाढ झाल्यास याची परिणती केरोसिनच्या किमती गेल्यावर्षीच्या तुलनेत महागण्याचे संकेत मिळत आहेत.
इंधनाचे अनुदान हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कायमच चितेंचा विषय राहिलेला आहे. किंबहुना, आर्थिक सुधारणा करताना कायमच अनुदान काढून टाकण्याच्या सूचना पुढे आल्या होत्या. परंतु, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने या संदर्भातील निर्णय आजवर टप्प्याटप्प्याने घेण्यात आले आहेत. यामध्ये जून २०१० मध्ये पेट्रोलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करत बाजाराशी संलग्न केल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Kerosene signals two-and-a-half rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.