Join us

फास्टफूड क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; २०७३ कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 8:54 PM

आता फास्टफूड क्षेत्रातील एक मोठी कंपनी आपला IPO बाजारात आणत आहे. 

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमधील घोडदौड कायम असल्याचे दिसत आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या ट्रेंडिंग मुहुर्तालाही मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक वधारल्याचे पाहायला मिळाले. यातच अनेकविध क्षेत्रांतील विविध कंपन्यांचे आयपीओ एकामागून एक शेअर बाजारात धडकत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली संधी प्राप्त होत आहे. आता फास्टफूड क्षेत्रातील एक मोठी कंपनी आपला IPO बाजारात आणत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केएफसी आणि पिझा हट या फूड चेन ऑपरेट करणाऱ्या सफायर फूड्सकडून प्राथमिक बाजारात समभाग विक्री करून २०७३ कोटी उभारले जाणार आहेत. फायर फूड्सचे भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये ४३७ रेस्तरॉं आहेत. या कंपनीच्या IPO ची दरश्रेणी प्रति इक्विटी समभाग १,१२० रुपये ते १,१८० रुपये यांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. 

कधी खुला होणार आयपीओ?

सफायर फूड्सचा IPO ९ नोव्हेंबर रोजी खुला होणार असून, ११ नोव्हेंबर रोजी बंद होईल. किमान १२ इक्विटी समभाग आणि त्यानंतर १२च्या पटीतील इक्विटी समभागांसाठी बोली लावली जाऊ शकेल. प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावामध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १७,५६९,९४१ इक्विटी समभागांच्या विक्रीचा प्रस्ताव आहे. या समभाग विक्रीत एक तृतीयांश अँकर इन्व्हेस्टर पोर्शन देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवला जाईल आणि हे देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून, अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन दराला किंवा त्याहून अधिक दराला, प्राप्त झालेल्या वैध बोलीच्या अधीन असेल. ५ टक्के क्यूआयबी पोर्शन केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणबद्ध पद्धतीने वितरणासाठी उपलब्ध असेल. उर्वरित क्यूआयबी पोर्शन सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांच्या आधारे प्रमाणबद्ध पद्धतीने वितरणासाठी उपलब्ध असेल.

दरम्यान, उर्वरित क्यूआयबी पोर्शन सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांच्या आधारे प्रमाणबद्ध पद्धतीने वितरणासाठी उपलब्ध असेल. इक्विटी समभाग बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार