नवी दिल्ली : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर देशातील काही भागांत यंदा पावसाने ओढ दिल्यानंतरही जुलैअखेर गेल्या वर्षीपेक्षा ९ टक्के अधिक खरिपाची पेरणी झाली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या ७०३.४३ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ३१ जुलैअखेर ७६४.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविल्यानंतरही पेरणीत झालेली वाढ समाधानकारक आहे. यंदाच्या हंगामातील पर्जन्यतूट ५ टक्क्यांवर आल्याने जुलै महिन्याची देशभरातील तूट १७ टक्के झाली.
कापसाचे क्षेत्र वगळता देशात खरिपाच्या पेरणीत यंदा वाढ नोंदली गेली आहे. डाळवर्गीय पिकांच्या पेरणीत २१ टक्के व तेलबियांच्या पेरणीत सुमारे १० टक्के वाढ नोंदविण्यात आली.
जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्र वगळता देशात चांगला पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले, तसेच तेलबिया, डाळी, भरड व तृण धान्याच्या पेरणीतही वाढ झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
खरिपाच्या क्षेत्रात ९ टक्के वाढ!
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर देशातील काही भागांत यंदा पावसाने ओढ दिल्यानंतरही जुलैअखेर गेल्या वर्षीपेक्षा ९ टक्के अधिक खरिपाची पेरणी झाली आहे.
By admin | Published: August 7, 2015 09:54 PM2015-08-07T21:54:36+5:302015-08-07T21:54:36+5:30