नवी दिल्ली : यंदा आतापर्यंत कमी पाऊस झाला असला तरीही रबी हंगामात अन्नधान्याचे उत्पादन पाच टक्क्यांनी वाढून ते १३३ दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी मंगळवारी ही माहिती दिली.अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सरकारचा हा चौथा अग्रीम अंदाज आहे. यापूर्वी २०१४-१५ या पीक वर्षासाठी सरकारने १२६.३८ मेट्रिक टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. जुलै-जून या २०१४-१५ वर्षाच्या कालावधीत १३०.७५ मेट्रिक टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर राधामोहनसिंग म्हणाले की, यंदा तसा पाऊस कमी झाला असला तरीही सरकारला गेल्या वर्षापेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादनाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात कमी पाऊस झालेल्या राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे आम्ही आता १३२.७८ मेट्रिक टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.खराब पावसाळ्यामुळे २०१५-१६ या खरीप हंगामात एकूण धान्य उत्पादन १.७८ टक्क्यांनी घटून १२४.०५ मेट्रिक टन उत्पादनाची शक्यता सरकारने वर्तविली होती. २०१४-१५ (जुलै-जून) या खरीप हंगामात १२६.३१ मेट्रिक टन धान्य उत्पादन झाले होते.
दुष्काळी परिस्थितीतही खरीप उत्पादन वाढणार
By admin | Published: September 22, 2015 10:14 PM