Join us  

खूशखबर - परवापासून एटीएममधून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही

By admin | Published: January 30, 2017 6:39 PM

1 फेब्रुवारीनंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णतः हटवण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदीनंतर सुरु असलेला चलनतुटवडा संपल्याचे दिसतं आहे. 1 फेब्रुवारीनंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णतः हटवण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांना एटीएममधून आता दररोज 24 हजार रुपये काढता येणार आहेत. 
 
8 नोव्हेंबर 2016 रोजी सांयकाळी काळ्यापैशाविरोधात कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आरबीआय कडून पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या नव्या नोटा व्यवहारात आणल्या. 
 
नागरिकांना हा मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँकेने व्यापाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर चालू खात्यावरील व्यवहारांवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. हे सर्व निर्बंध मागे घेण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. हा नियम सुद्धा १ फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहे.