Lokmat Money > बिझनेस न्यूज > किडनी ट्रान्सप्लान्टने दोघांना जीवदान

किडनी ट्रान्सप्लान्टने दोघांना जीवदान

By admin | Published: January 23, 2015 01:05 AM2015-01-23T01:05:54+5:302015-01-23T01:05:54+5:30

Kidney transplant gives life to both | किडनी ट्रान्सप्लान्टने दोघांना जीवदान

किडनी ट्रान्सप्लान्टने दोघांना जीवदान

>वाणिज्य बातमी ... १५ बाय २ ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...
किडनी ट्रान्सप्लान्टने
दोघांना जीवदान
नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये १४ जानेवारी २०१५ रोजी सहावी किडनी डोनर ट्रान्सप्लान्ट सर्जरी करण्यात आली. नागपूरचा रहिवासी आणि औरंगाबाद येथे कार्यरत असलेल्या युवकाचे अपघाती निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर परिवाराने किडनी दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे दोन गरजू रुग्णांना जीवदान मिळाले.
एका रुग्णालयातून प्राप्त केली किडनी दुसऱ्या रुग्णालयात एका तासाच्या आत आणण्यात आली आणि तेथील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. अशी शस्त्रक्रिया मध्य भारतात प्रथमच करण्यात आली. हे प्रत्यारोपण हॉस्पिटलच्या तज्ज्ञ चमूच्या देखरेखीखाली पार पडले. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. समीर चौबे, ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. संजय कोलते. ट्रान्सप्लान्ट को-ऑडिनेटर डॉ. राजेश गाडे आणि त्यांच्या तांत्रिक चमूने हे कार्य केले. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध परिवहन आणि हस्तांतरणाच्या सुविधेमुळे किडनीचे स्थलांतरण सहजतेने आणि त्वरित करण्यात आले. प्रथमच शहरातील दोन रुग्णालयातील सामंजस्य आणि समन्वयातून अंगाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
एक किडनी ओसीएचआरआयमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला तर दुसरी किडनी झेडटीसीसीने दिशानिर्देशानुसार वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल ४५ वर्षीय पुरुष रुग्णाच्या उपयोगात आणण्यात आली. या सर्जरीमध्ये डॉ. जितेंद्र हजारे, डॉ. सुरोजित हजारे आणि ॲनिस्थेलॉजिस्ट डॉ. सरिता जोगळेकर सहभागी झाले. या प्रत्यारोपणात दोन रुग्णालय असून त्याचे समन्वयक, झेडटीसीसी तज्ज्ञ- डॉ. मकरंद व्यवहारे आणि जीएमसीचे डॉ. अनिंदो मुखर्जी आणि ट्रान्सप्लान्ट चमूच्या परस्पर सहयोग आणि समन्वयाचे दर्शन होते. परिणामी हे पहिले आंतर कडॅवरिक किडनी प्रत्यारोपण करणारे रुग्णालय ठरले आहे. डॉ. समीर चौबे म्हणाले की, दोन रुग्णालयाच्या समन्वयातून असे काही होऊ शकते, अशी शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. हे सकारात्मक परिवर्तन आहे. डॉ. संजय कोलते यांनी शहरातील हे पहिले प्रत्यारोपण असल्याचे सांगितले.

Web Title: Kidney transplant gives life to both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.