माळवाडीत महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन सोहळा
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
माळवाडी : येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान वेगवेगळ्या अभंगावर कीर्तनाचा सोहळा होणार आहे. महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा भजनापासून सुरू होऊन, रात्री ९ वाजता कीर्तनाने संपणार असल्याचे महाशिवरात्री उत्सव समिती, कार्यवाहक दिनेश भदाणे, बाळासाहेब बागुल यांनी सांगितले आहे. यात मधुकर महाराज शेलार (वडगाव), पद्माकर महाराज देशमुख दि. १७ रोजी दुपारी २ वाजता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाजरा इंदोरकर यांचे कीर्तन तर त्याच रात्री ९ वाजता जयवंत महाराज बोधले, पंढरपूर संस्थान यांचे आणि दि. १८ रोजी सकाळी ९ वाजता संजय धोंडगे यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे.
माळवाडी : येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान वेगवेगळ्या अभंगावर कीर्तनाचा सोहळा होणार आहे. महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा भजनापासून सुरू होऊन, रात्री ९ वाजता कीर्तनाने संपणार असल्याचे महाशिवरात्री उत्सव समिती, कार्यवाहक दिनेश भदाणे, बाळासाहेब बागुल यांनी सांगितले आहे. यात मधुकर महाराज शेलार (वडगाव), पद्माकर महाराज देशमुख दि. १७ रोजी दुपारी २ वाजता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाजरा इंदोरकर यांचे कीर्तन तर त्याच रात्री ९ वाजता जयवंत महाराज बोधले, पंढरपूर संस्थान यांचे आणि दि. १८ रोजी सकाळी ९ वाजता संजय धोंडगे यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे. या महाशिवरात्री उत्सव सोहळ्याला शुभप्रेरक म्हणून मकरंदवाडीचे कीर्तन केसरी ह.भ.प. संजय (नाना) धोंडगे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. या दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी ता. १७ रोजी सकाळी ९ वाजता शिवलीलामृत पारायण होईल. नंतर दुपार सत्रात शिवअभिषेक, सायंकाळी पालखी मिरवणूक होईल.