Lokmat Money > बिझनेस न्यूज > होम टेक्स्टाईलसाठी कीर्ती सनन यांचे ‘द अफेअर टू रिमेम्बर’

होम टेक्स्टाईलसाठी कीर्ती सनन यांचे ‘द अफेअर टू रिमेम्बर’

घरगुती कपड्यांच्या वापराची निर्मिती करणाऱ्या ट्रायडन्ट कंपनीने त्यांच्या ‘बाथ अँड होम’ या लीननपासून बनविलेल्या कपड्यासाठी नवीन मल्टिमीडिया कॅम्पेन सादर केले आहे.

By admin | Published: July 16, 2015 04:37 AM2015-07-16T04:37:30+5:302015-07-16T04:37:30+5:30

घरगुती कपड्यांच्या वापराची निर्मिती करणाऱ्या ट्रायडन्ट कंपनीने त्यांच्या ‘बाथ अँड होम’ या लीननपासून बनविलेल्या कपड्यासाठी नवीन मल्टिमीडिया कॅम्पेन सादर केले आहे.

Kirtan Sanan's 'The Affair to Remember' for Home Textile | होम टेक्स्टाईलसाठी कीर्ती सनन यांचे ‘द अफेअर टू रिमेम्बर’

होम टेक्स्टाईलसाठी कीर्ती सनन यांचे ‘द अफेअर टू रिमेम्बर’

मुंबई : घरगुती कपड्यांच्या वापराची निर्मिती करणाऱ्या ट्रायडन्ट कंपनीने त्यांच्या ‘बाथ अँड होम’ या लीननपासून बनविलेल्या कपड्यासाठी नवीन मल्टिमीडिया कॅम्पेन सादर केले आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सॅनन यांच्यावर चित्रित केलेले हे कॅम्पेन असून ‘द अफेअर टू रिमेम्बर’ अशा संकल्पनेवर या कॅम्पेनची मांडणी करण्यात आली आहे. गोरेगाव (मुंबई) येथील बॉम्बे एक्झिबिशन सेन्टर येथे सुरू असलेल्या होम डेकोर, गिफ्टस् आणि हाऊसवेअर घटकांच्या एका भव्य प्रदर्शनात याचे अनावरण करण्यात आले. ट्रायडन्ट कंपनीचे अध्यक्ष राजीन्दर गुप्ता आणि इंडिया मार्केटिंग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश भाटीया आणि या कॅम्पेनचा केंद्रबिंदू असलेल्या अभिनेत्री कीर्ती सॅनन यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे अनावरण झाले. या जाहीरातीच्या माध्यमातून ज्या उत्पादनांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे ती सर्व कापड उत्पादने ही अत्युच्च दर्जाच्या सुतापासून निर्मिती केलेली असून नव्या-जुन्या
डिझाईनची सांगड घालत अधिक आकर्षकपणे तयार करण्यात आली आहेत.
या संदर्भात कंपनीचे अध्यक्ष राजीन्दर गुप्ता यांनी सांगितले की, होम टेक्स्टाईल या संकल्पनेचा आता भारततही वापर वाढीस लागत असून त्या संदर्भात जागरूकताही वाढीस लागत आहे. ग्राहक गुणवत्तेची कास धरत या उत्पादनांकडे वळत आहे. या सर्व निकषांचा विचार करून आम्ही उत्पादनांची निर्मिती करत असल्याचे गुप्ता म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Kirtan Sanan's 'The Affair to Remember' for Home Textile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.