Lokmat Money > बिझनेस न्यूज > किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं? कोणत्या कागदपत्रांची गरज? पाहा संपूर्ण माहिती...

किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं? कोणत्या कागदपत्रांची गरज? पाहा संपूर्ण माहिती...

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना सबसिडीसह सुलभ कर्ज दिले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 09:25 PM2023-11-17T21:25:22+5:302023-11-17T21:25:52+5:30

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना सबसिडीसह सुलभ कर्ज दिले जाते.

Kisan Credit Card: How to get Kisan Credit Card? What documents are required? see... | किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं? कोणत्या कागदपत्रांची गरज? पाहा संपूर्ण माहिती...

किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं? कोणत्या कागदपत्रांची गरज? पाहा संपूर्ण माहिती...

Kisan Credit Card: भारत हा कृषीप्रधान देश असून, देशातील मोठा वर्ग शेती करतो. दिवस असो वा रात्र, हिवाळा असो वा उन्हाळा, शेतकरी नेहमीच शेतात राबत असतो. शेतकरी शेतात राबतो, तेव्हाच कोट्यवधी लोकांच्या पोटात अन्न पोहोचते. मात्र शेती करताना शेतकऱ्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशाच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. 

अनेक शेतकऱ्यांकडे पिकं घेण्यासाठी पुरेशी साधनं नाहीत, तर अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे देशातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. तुम्हीही या कार्डसाठी अर्ज कसा करू शकता. यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील आणि हे कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड ?
किसान क्रेडिट कार्ड एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहेत, जे शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी, कृषी उपकरणे खरेदी करण्यासह इतर कृषी संबंधित खर्चासाठी कर्ज देते. याद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी गरजा पूर्ण केल्या जातात.  

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावे?
- तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करा.

- फॉर्म भरा आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा. यानंतर, बँकेकडून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेतूनही फॉर्म मिळवू शकता.

अर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत:-
-अर्जदाराचे पॅनकार्ड
-अर्जदाराचे आधार कार्ड
-अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
-शपथपत्र, ज्यामध्ये तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसल्याची माहिती असते.

हे जबरदस्त फायदे मिळतात
किसान क्रेडिट कार्ड बनवल्यानंतर शेतकरी 9 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. त्याचबरोबर सरकारने व्याजावर दिलासा देत 2 टक्के सबसिडी दिली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेपूर्वी व्याज भरले तर त्याला सरकार स्वतंत्रपणे 3 टक्के सबसिडी देते. म्हणजे तुम्हाला फक्त 4 टक्के एकूण व्याज द्यावे लागेल.

Web Title: Kisan Credit Card: How to get Kisan Credit Card? What documents are required? see...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.